Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
महायुतीचा उमेदवारा समोर मोठे आव्हान, 'मविआ'कडून प्रवीण चौरे नी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज बंडखोरांची संख्या वाढल्याने प्रमुख पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार
महायुतीचा उमेदवारा समोर मोठे आव्हान, 'मविआ'कडून प्रवीण चौरे नी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज बंडखोरांची संख्या वाढल्याने प्रमुख पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार
लोकसभा निवडणुकीत भाजपाला नाकारले !
अदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या साक्री मतदार संघ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे. गत विधानसभा वगळता हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.२०१९ मध्ये अपक्ष उमेदवारी करत मंजुळा गवीत यांनी विजय मिळविला.स्पासाठी पक्षांतर्गत बंडाळी देखील कारणीभुत ठरली.आता शिवसेना शिंदे पक्षाकडून मंजुळा गावीत. आपले नशिभ अजमावित आहेत. २०१९ मध्ये भाजपाकडून उमेदवारी करत अल्पमतांनी पराभूत झालेले इंजि.मोहन सूर्यवंशी हे देखील रेस मध्ये होते.मात्र,मित्र पक्षाला तिकीट सुटल्याने इंजि.सूर्यवंशी बंडाळी करणार हे जवळपास निश्चित झालेले आहे.या शिवाय मंजुळा गावितांसमोर महाविकास आघाडीकडून माजी खा.बापू चौरे यांचे सुपुत्र प्रवीण चौरे यांच्या रुपाने तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे.या आव्हानात तरुन जात पुन्हा विजयश्री खेचण्याचा मार्ग खडतर आहे.साक्री मतदार संघात दहिते कुटूंबाचा वरचष्मा नेहमीच राहिला आहे.यामुळे या वेळेस दहिते कुटुंब कोणाच्या पाठीमागे आपली रसद व ताकद पुरविते हे
पहाणे देखील महत्वाचे आहे.
साक्री विधानसभा मतदार संघ हा नंदुरबार लोकसभा मतदार संघातर्गत येतो.या लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून सलग दोन वेळेस डॉ.हिना गावीत विजयी झाल्या होत्या. मात्र,या वेळेस मतदारांनी भाजपाला सपशेल नाकारले, आदिवासी मतदारांनी परिवर्तन घडवित,अत्यंत नवख्या असलेल्या अॅड गोवाल पाडवी यांच्या सोबत राहिले.आघाडीच्या समर्थनात गेलेल्या मतदारांना पुन्हा आपलेसे करण्याचे आव्हान युती सोबत आहे.
साक्री मतदार संघ हा धुळे,नंदूरबार आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सिमांतर्गत भागातील मतदार संघ आहे.आदिवासीबहुल मतदार संघ असल्याने या मतदार संघात आदिवासी मतदार निर्णायक ठरतात.हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.अगदी २०१४ मध्ये संपूर्ण देशात भाजपाची मोदी लाट असताना देखील या मतदार संघातून आमदार डी.एस.अहिरे है विजयी झाले होते.या मतदार संघात अहिरे,चौरे,भोये या कुटूंबातील व्यक्तींनी सर्वाधिक कालावधीपर्यंत सत्ता उपभोगली.'भाजपाच्या जुन्या कार्यकर्ते असलेल्या आणि
धुळे महापालीकेत भाजपाचे महापौर म्हणून मान मिळविलेल्या मंजुळा गावील यांनी २०१९ मध्ये भाजपाकडून उमेदवारीची आस लावली होती. मात्र,ऐन वेळेस मंजुळा गावीत यांचा पत्ता कट करून इंजि, मोहन सूर्यवंशी यांना भाजपाने उमेदवारी दिली.शिवाय काँग्रेसकडून डी.एस.अहिरे मैदानात होते.दोन मातब्बर पक्षांचे उमेदवार रिंगणात असताना मंजुळा गावीत यांनी अपक्ष उमेदवारी केली.त्यांनी आणि डॉ.तुळशीराम गावीत यांनी मतदार संघ पिंजून काढत मतदारांच्या मनात घर केले.मातब्बरांच्या विरोधात लढा देत मंजुळा गाविताचा
आघाडीत बिघाडी झाली तर मार्ग सुकर होणार आहे त्यातच काम्युनिष्ठ पक्षाची उमेदवारी ही देखील महाविकास आघाडी साठी डोकेदुखी ठरू शकते त्याचा किती फायदा कोणाला होणार ही येणारी वेळच ठरवेल त्यातच कॉग्रेस कडून नाराज झालेले माझी आमदार डी एस अहिरे यांचे चिरंजीव धीरज अहिरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे पिंपळनेरचा पश्चिम पट्टा कुणाच्या पारड्यात आपली मत टाकतो हे निर्णायक ठरणार आहे
महाविकास आघाडीत देखील इच्छुकांची संख्या अधिक होती.मात्र, आता माजी खा.बापू चौरे यांचे सुपूत्र प्रवीण चौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षातील इच्छुक बंडाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे.जर तसे झाले तर त्याचा फायदा विद्यमान आमदारांना होणार आहे.यामुळे आपाही समोर बंडखोरी टाळण्याचे आव्हान राहणार आहे.
पश्चिम पट्यातील निर्णायक मतदारांवर मदार !
गावीत विजयी देखील झाल्या.त्या नंतर त्यांनी शिवसेनेला पाठींबा दर्शविला.शिवसेनेच्या आंतर्गत बंडाळीत त्यांनी शिंदे गटा सोबत राहिल्या.त्याचे फळ म्हणुन शिवसेना शिंदे पक्षाच्या पहिल्याच यादीत मंजुळा गावीत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
संघटनात्मक बांधणी करत होते.मात्र,शिवसेना
सन २०१९ च्या निवडणुकीत पराभव पट्टी पडल्यानंतर देखील निसटता इंजि.मोहन सूर्यवंशी हे पक्षासोबत एकनिष्ठ राहुन
सुर्यवंशी यांना उमेदवारीसाठी आग्रह केला मात्र त्यांना उमेदवारी देणे भाजप ला शक्य झालें नाही त्यामुळे मोहन सूर्यवंशी यांनी देखील मोठ्या ता कडीने विद्यमान आमदार गावित यांना चॅलेंज करत अपक्ष उमेदवारी केली आहे यामुळे महायुतीची गणिते बिगडताना दिसत आहेत
सामोडे चे दहिते व मालपूरच्या भामरे कुटूंबाची भुमिका महत्वाची ठरणार ! मात्र ते मालपूर चे भामरे परिवार आजही महायुती धर्म पाळताना दिसत आहे मात्र साक्री तालुक्यातील भाजपचा एक गट हा थेट बंडखोरी करत अपक्ष उमेदवार विजय ठाकरे यांचा सोबत असल्याचे बोलले जात आहे.
साक्री तालुक्यातील सामोडे गावातील शिवाजीराव दहिते यांचा जिल्हा परिषदेवर सर्वाधिक कालावधीपर्यंत एकाहाती सत्ता राहिला आहे.त्यांच्या शब्दाला साक्री तालुक्यात मान देखील आहे.माजी आ.डी.एस.अहिरे यांच्या विजयात दहिते गटाची हमीच मोठी भुमिका राहत होती.मात्र आता परिस्थिती बदललेली दिसून येत आहे,दहिते भाजपात गेल्यानंतर काँग्रेसमध्ये राहिलेल्या अहिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.आता देखील दहिते भाजपात आहेत. यामुळे ते शिंदे गटाच्या उमेदवाराला प्राणपणाने मदत करतात की इतरांना रसद पुरवितात हे पहाणे महत्वाचे आहे.दहिते गटाची भुमिका निर्णायक राहणार आहे.या शिवाय माजी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि सुरेश भामरे यांचे देखील साक्री तालुक्यात प्रस्थ आहे.गैरआदिवासी गावात आणि आदिवासी भागातून भामरे कुटूंबाच्या शब्दाला मान आहे.यामुळे भामरे कुटूंबाची रसद ज्याच्या पाठीशी त्याचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
मतदार संघातील कळीचे मुद्दे !
साक्री मतदार संघात धर्मातदाराचा महत्वाचा मुद्दा आहे. भाजपाने काही महिन्यांपुर्वी नंदवार येथे आयोजित केलेला मेळावा,आंदोलनामुळे धांतरीत आदिवासींमध्ये नाराजी आहे.या शिवाय मणिपुरच्या घटनेनंतर आदिवासींमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यात म्हणावे तसे यश युतीला आलेले नाही.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत फटका बसलेला आहे.या शिवाय भौतिक सुविधांची वाणवा, वाडी-वस्त्यांमध्ये विजेचा प्रश्न,पिंपळनेर ग्रामपंचायत दजॉनती, विभाजीत ग्रामपंचायतींचा विकास इ. मुद्दे आहेत.असे असले तरी विद्यमान आमदारांसाठी लाडकी बहिण योजना तारणहार ठरणार असल्याचे दिसते.
साक्री मतदार संघात पिंपळनेर पासून पश्चिम पट्यातील मतदार हे निर्णायक ठरत असते.या भागातील आदिवासींमुळे कुळ हा महत्वाचा फॅक्टर आहे.यापुर्वी या भागातून मंजुळा गावीत यांना बळ मिळाले होते. यावेळेस हवा पालटलेली आहे. या भागाल चौरे,अहिरे आणि इंजि. सूर्यवंशी यांनी देखील सभा बैठका आणि मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट उभी केली आहे.या शिवाय साक्री तालुक्यात गैर आदिवासी मतदारांची संख्या देखील अधिक आहे. त्यांना गृहीत धरणे धोक्याचे होणार आहे.
निसटता पराभव झाल्याने राजेंद्र
शिंदे आणि भाजपाच्या युती असल्याने मोहन सूर्यवंशी यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे.२०१९ च्या निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने काम करणारे इंजि.सूर्यवंशी हे देखील इच्छुकांमध्ये होते.मात्र, आता मित्र पक्षाला तिकीट सुटल्याने त्यांची नाराजी उघड आहे.याच नाराजीला कार्यकस्थांनी भर देत,मोहन
आहे.कार्यकत्यांच्या आग्रहामुळे इंजि.सूविंशी है अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.भाजपा ही बंडखोरी रोखण्याल यशस्वी झाली नाही.तर या बंडखोरीचा थेट फटका मंजुळा गावीत यांना बसणार हे निश्चित आहे.युतीत अंतर्गत कलह असताना दुसरीकडे आघाडीकडून देखील इच्छुकांची संख्या मोठी होती. इच्छुकांमध्ये माजी खासदार बापु चौरे यांचे सुपुत्र प्रविण चौरे, माजी आमदार डी.एस.अहिरे यांचे सुपुत्र जि.प.सदस्य धिरज अहिरे,इंजि.के.टी.सूर्यवंशी, इंजी.अशोक सोनवणे,संजय बहिरम,डॉ.विशाल वळवी,
हिम्मत साबळे यांच्यासह पश्चिम पट्यातुन काही इच्छुकांचा समावेश होता. या इच्छुकांनी काही महिन्यांपासुनच मतदार संघात मोर्चे बांधणी केलेली होती.अखेर महाविकास आधाडीने जाहीर केलेल्या या यादीत प्रवीण चौरे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला होता. तो पुर्वक्त मिळविण्यासाठी आघाडीकडून शधीचे प्रयत्न होणार आहेत.युतीतील बंडखेरीसह आघाडीचे आव्हानाला सामोरे जात आपला गड अबाधित राखण्यासाठी मंजुळा गावीत यांना शिकस्त करावी लागणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री ऐन विधानसभा निवडणूकीत तोंडावर साक्रीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणूकीत उमदेवारी देतांना निष्ठावंताना डावलून आय...
-
अमळनेर प्रतिनिधी : भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सु...
-
अमळनेर प्रतिनिधी :- कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.विका...
-
साक्री तालुक्याचा काटवाण भागातील म्हसदी परिसरात सामाजिक कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करणारे काळगाव गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्...
-
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपान...
-
साक्री प्रतिनिधी- पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मा...
-
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा अनुशेष भरण्याचे आश्वासन अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांक...
-
भूम, शिवसेना-महायुतीच्या वतीने दि २९ रोजी उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी २४३ भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल...
-
अमळनेर प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा