Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४
डॉ. तानाजी सावंत यांच्या उमेदवारीने जनतेत उत्साहाची लाट; विकासाचा दृढ संकल्प
भूम, शिवसेना-महायुतीच्या वतीने दि २९ रोजी उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी २४३ भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित प्रचार सभेला जनसमुदायाने भरघोस प्रतिसाद दिला. सभेत अनेक सामान्य नागरिक, ज्यात फाटक्या धोतरातील वृद्ध, तीन रंगाचे लुगडे नेसलेल्या मातेपासून ते डोळ्यांत उज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन आलेली तरुणाई, सर्वांचे प्रतिनिधित्व दिसून आले.
गेल्या पाच वर्षांत जनतेने सोपवलेली विकासाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे समाधान व्यक्त करताना, डॉ. सावंत यांनी पुढील काळात आर्थिक समृद्धीची 'धवल क्रांती' व 'हरीत क्रांती' सह सर्वांना समृद्ध करणारी अर्थक्रांती घडवून आणण्याचा संकल्पही त्यांनी केला. या नव्या संकल्पनेतून जनतेच्या जीवनात मोठा बदल घडवण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित जनतेच्या उत्साहपूर्ण प्रतिसादातून त्यांनी लाखोंच्या मतांच्या फरकाने निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
डॉ. सावंत म्हणाले, “महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला नवीन प्रेरणा देतो आहे, आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवीन. आपल्या या भूमीला सुजलाम-सुफलाम करण्याच्या उद्दिष्टासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन.”
सभेचे सूत्रसंचालन धाराशिवचे शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके आणि दत्ता आण्णा साळुंखे यांनी केले. व्यासपीठावर लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मारूती क्षीरसागर, रिपाइंचे भागवतराव शिंदे, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव शिंदे, रिपाइंचे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, भाजपाचे विधानसभा समन्वयक बाळासाहेब क्षीरसागर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोईटे, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
जनतेत सकारात्मक ऊर्जा व उत्साहाच्या वातावरणाने स्फुरण आणलेल्या या सभेतून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर तालुक्यात बेकायदा सावकारांचा बोलबाला, झालारे झाला अखेर गुन्हा दाखल झाला..! बेकायदा सावकारांचे धाबे दणाणले, तालुक्यातील बडे मासे पोलि...
-
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...
-
शेतकरी वृद्ध असल्याने सुदैवाने बचावला अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर ब...
-
नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन व...
-
दै. तरूण गर्जना रिपोट भाऊबीजेच्या दिवशी तापी नदीत उडी मारून केली होती आत्महत्या अमळनेर : चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला ...
-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी *...
-
साक्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सुविधा पूर्णपणे डासळली गेल्याने प्रशासनास पत्रव्यवहार करून हि आरोग्य विभागाने झोपेचं सोंग करून संबंधितावर...
-
नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी य...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- धुळ्ळ्याकडून शिरपूर कडे जाणाऱ्या विना वाहक शिवशाही ने रात्री ८ वाजेच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यु०४०७ ला ग...
-
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून देशातील ३० शहरं भिकारीमुक्त बनवण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी एक पायलट प्रोजेक्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा