Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

साक्री तालुक्यातील विद्यमान आ.सौ मंजुळाताई गावित यांनी काल साक्री तहसील कार्यालयात मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज.



साक्री तालुक्यातील विद्यमान आमदार बासौ मंजुळाताई गावित यांनी आज साक्री तहसील कार्यालयात मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला एबी फॉर्म दाखल केला फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. बालाजी क्षिरसागर,अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत चित्ते यांनी फॉर्म स्वीकारला.
आमदार सौ मंजुळाताई यांनी राजे पार्क येथून ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढत साक्री मेन बाजार पेठ,साक्री
नगरपालिका मार्गे,दुपारी तहसील कार्यालयात दाखल झाल्या यावेळी त्यांच्यासोबत शिक्षक आमदार किशोर दराडे,संपर्कप्रमुख विजय करंजकर,डॉ.तुळशिराम गावीत,गोकुळ परदेशी,भाजपाचे सुरेश रामराव पाटील,सुरेश सखाराम सोनवणे, वसंतराव बच्छाव,अरविंद भोसले सौ.कवीता क्षिरसागर,सौ.संगीता पगारे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ज्ञानेश्वर एखंडे,संभाजीराव अहिरराव,प्रशांत चौधरी व तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उप सरपंच कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते,या वेळी
विजय करंजकर म्हणाले साक्री तालुक्याच्या आमदारसौ.मंजुळा ताई गावीत यांनी विधानसभेत तालुक्याच्या विकासासाठी प्रखर त्याने आवाज उठवत कामे करून घेतली तसेच त्यांना पुन्हा आपण संधी द्या तर मंजुळा गावित म्हणाल्या मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गाव पाड्यापर्यंत शक्य तेवढी गावाच्या दृष्टीने उपयोगी पडणारे कामे केली कोट्यावधीचा निधी मी तालुक्यात आणला तसेच बंद पडलेल्या
सूतगिरणीसाठी देखील साहेब सतरा कोटी रुपये मंजूर करून घेतले असून हा प्रकल्पही लवकर सुरू करायचा मनोदय आहे तसेच तालुक्यातील राहिलेली कामे आपण मला पुन्हा संधी दिली तर नक्कीच पूर्ण होतील मी विकासाला अधिक महत्त्व दिले आहे आज माझ्या फॉर्म भरण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षातील तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध