Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

लेकीसह मातेला तापी नदीत उडी घेण्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहा जणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल



प्रकाशा तापी नदी पुलावरुन 3 वर्षाच्या लेकीसह आईने दिनांक 14 ऑक्टोबर रोजी उडी मारुन आत्महत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.परंतु आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झाले नसल्याने नागरिक हळहळसह तर्क लावत होते.मयत महिला दिपाली मधुकर मोरे वय – 28 हिचे पती मधुकर नारायण मोरे व इतर आरोपी यांनी तिच्या लग्न झाल्यापासून म्हणजे दिनांक 12/02/2020 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान नटराज सिनेमाच्या पाठीमागे रामदेव बाबा नगर धुळे तालुका धुळे जिल्हा धुळे येथे दिपालीला सफेद डाग (कोड) असल्याकारणाने सर्वांसमोर अपमान करायचे तिचे पती तिला शिवीगाळ करून मारहाण करत असत. सर्वजण टोमणे मारून तिच्या मानसिक छळ करत होते. दिपालीला तिचे पती व इतर घरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते.त्याला कंटाळून तिचे दिनांक 14/10/2024 रोजी प्रकाशा जिल्हा नंदुरबार येथे तापी नदीमध्ये तिची मुलगी टीना मधुकर मोरे वय 03 वर्षे हिचेसह उडी मारून आत्महत्या केली आहे.

म्हणुन 

1)मधुकर नारायण मोरे
2)सुशीलाबाई कैलास मोरे 
3)उषाबाई सुनिल मोरे
4) आशाबाई रवि मोरे
5)अनिल नारायण मोरे
6)सुनिल नारायण मोरे सर्व रा.अवधान ता. जि. धुळे

यांनी दिपाली हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने मयत दिपालीची आई सुनंदा सुखदेव ढोले रा. सेंधवा ता.सेंधवा जि.बडवाणी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात वरील सहा जणांविरुद्ध भा.न्या.सं. कलम 108,85,111(2),352,3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध