Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

साक्री तालुक्यातील शेवडीपाडा ग्रामस्थांचे जल जीवन योजनेत भ्रष्टाचारा बाबत जि.प.धुळे येथे अमरण अन्न त्याग उपोषण...



साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथे जल जिवन मिशन योजनेत मौजे शेवडीपाडा येथे नळ पाणी पुरवठा जलजीवन योजनेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी संगनमताने अपुर्ण काम पुर्ण दखवत कामांच्या ताबा पावतीवर ग्रामसेविकेच्या च्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन भष्टाचार लपविण्यासाठी ग्रामसेविकेच्या अन्याकारक बदली व निलंबनाची कारवाई केली गेली असे आरोप ग्रामस्थांनी केली आहेत
या बोगस अपूर्ण कामाची निपक्षपणे चौकशी होऊन संबंधित सर्व दोषीवर करोडो रुपयांचा झालेल्या भ्रष्टाचार केल्याच्या बाबत गटविकास अधिकारी पं.स साक्री तसेच मुख्यकार्यकारी पाणी पुरवठा अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे तक्रार करुन चौकशी अथवा चौकशीचे आदेश सुध्दा दीले नाहीत म्हणून आम्हा आदिवासी शेवडीपाडा याना १०/०९/२०२४ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना व प्रशासनाला निवेदन दिले होते निवेदनात म्हटले होते चौकशी करून दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.नाही केल्यास आम्ही दि.३०/०९/२०२४ पासुन अमरण उपोषणाला बसनार परतु वरीष्ठ अधिकारी नी कुठलेही चौकशी केली नाही.व आम्हा आदिवासी बांधवांना आश्वासन दिले नाही.व अमरन उपोषण पासुन आश्वासन देऊन रोखले नाहीं.विस्तविक पाहता शासनाने दुर्गम भागातील ग्रामस्थांना शुद्ध पियजल पिण्यासाठी उपलब्ध व्हावे,त्यांचे आरोग्य रहावे याकरिता पेसा अंतर्गत गाव पाढे वाडे यात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे घेण्याकरिता करोडोचा निधी निश्चित करण्यात आला आहे.जल जीवन मिशन अंतर्गत मौजे शेवटीपाडा येथे सन २०२२ -२०२३ या पिण्याच्या पाण्याकरिता सिंचन लिफ्ट विहीर,पाईपलाईनचे काम घेण्यात आले होते.सिंचन विहिरीचे काम न करता तसेच पाईपलाईन चे पूर्ण काम न करता सौ सुमित्रा साहेबराव गांगुर्डे जि.प.सदस्य शेलबारी गट.यांचे पती श्री साहेबराव गांगुर्डे यांनी विग्नहर्ता कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सदर काम केले आहे धुळे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे पाणीपुरवठा अधिकारी अभियंता व ठेकेदार यांना हाताशी धरून संगणमताने जल जीवन योजनेचे कामात बी मालुमपणे योजनेचा भ्रष्टाचार केला आहे सदर काम अपूर्ण अवस्थेत ताबा पावतीवर श्रीमती उज्वला संभाजीराव निकम ग्रामसेविका शेवडीपाडा यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने संबंधित गट विकास अधिकारी पं.स.साक्री यांना हाताशी धरून सांगनमताने एका वर्षाच्या आतच त्यांची बदली करून त्यांचे अन्यायकारक बेकायदेशीर निलंबन करण्यात आले आहे.जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे बोगस अपूर्ण कामाची सविस्तर चौकशी करून संबंधित सर्वच कसूरवार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे यांच्याकडे खालील प्रमाणे ग्रामपंचायत येथील जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून अनेक तक्रारी सादर केल्या आहेत तसेच वेळोवेळी संबंधितांना भेटून पाठपुरावा देखील केला आहे.श्री बळीराम सुक्राम ठाकरे,श्री रामा सोमा ठाकरे,अरुण शिवराम ठाकरे,श्री मोतीराम सिताराम बहिरम व इतर अनेक ग्रामस्थ शेवडीपाडा ता.साक्री जि.धुळे यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.परंतु जल जीवन मिशन योजनेअंतर्गत योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली नाही.मात्र,या योजनेच्या ठेकेदारांनी अंदाज पत्रकातील अटीशर्तीचे पालन केलेले नाही मौजे शेवडीपाडा येथील पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण बोगस गुणवत्ताहीन कामातील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार कामात म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी,म.उपकार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जिल्हा परिषद धुळे.म.गटविकास अधिकारी पं.स.साक्री त्यांच्या कार्यालयातील लिपिक, लेखापाल,अभियंते,ठेकेदार,सौ सुमित्रा साहेबराव गांगुर्डे जि.प.सदस्य शेलबारी गट त्यांचे पती श्री साहेबराव रुपला गांगुर्डे शेवडीपाडा यांच्या सक्रिय सहभाग असल्याने त्यांचे समर्थन असल्याने आजपर्यंत आमच्या अनेक तक्रारी अर्जांची चौकशी करण्यात आलेली नाही.या अन्यायाविरोधात सर्व जागृत ग्रामस्थ शेवडीपाडा ता.साक्री जि.धुळे यांचे आज दिनांक ३०/०९/२०२४ वार सोमवार पासून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना च्या बोगस अपूर्ण कामांची निष्पक्षपणे चौकशी होऊन संबंधित सर्वच दोषी कसूरवार अधिकारी कर्मचारी अभियंता ठेकेदार लोकप्रतिनिधी तसेच श्री साहेबराव गांगुर्डे खाजगी व्यक्ती यांच्यावर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत च्या पाणीपुरवठा कामात संगणमताने भ्रष्टाचार केल्याच्या बाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही आमरण अन्नत्याग उपोषण करीत आहोत
श्री बळीराम सुक्राम ठाकरे,श्री रामा सोमा ठाकरे,श्री अरुण शिवराम ठाकरे,श्री मोतीराम सिताराम बहिरम
आणि इतर ग्रामस्थ शेवडीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे अमरण उपोषणाला बसले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध