Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

साक्रीत महाविकास आघाडीला धक्का ! उपजिल्हाप्रमुख, पिंपळनेर तालुकाप्रमुखांचा उबाठा सेनेला 'जय महाराष्ट्र'करीत शिंदे गटात प्रवेश




साक्री ऐन विधानसभा निवडणूकीत तोंडावर साक्रीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणूकीत उमदेवारी देतांना निष्ठावंताना डावलून आयातांना संधी दिली गेली.मात्र आम्ही पक्षासाठी रात्रंदिवस काम करूनही प्रत्येक वेळेस आमच्यावर अन्याय केला गेल्याचे म्हणज आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख हिंमत साबळे, पिंपळनेर तालुकाप्रमुख कैलास ठाकरे,विभागप्रमुख सुनील साबळे व युवासेनेचे पिंपळनेर तालुकाप्रमुख रमेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाला जय महाराष्ट्र केला.त्यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. प्रसारमाध्यमांसमोर आपली
नाराजी व्यक्त करतांना हिंमत कीया साबळे म्हणाले गेल्या १५ वर्षापासून पक्षासाठी काम करतोय.या काळात साक्री तालुक्यात गावागावात आणि घराघरात शिवसेना पोहचविली. ग्रामपंचायतींवर शिवसेनाचा भगवा फडकविला.२०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी काम केले.त्यानंतर २०१९ च्या विधानसभेची चांगली तयारी केली.त्यानंतर पक्षाचे श्री. मिर्लेकर यांचा दौरा झाला. पक्षाच्या मेळाव्यात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.तेव्हा पक्षाची मोठी ताकद दिसल्याने मिर्लेकर यांनी आपण साक्री जिंकू शकतो,असे विश्वास व्यक्त केला होता.मात्र बाहेरून आयात केलेले लोक साक्री तालुक्याचे नियोजन करतात,त्यांनी ऐनवेळी उध्दव ठाकरे यांना साक्री तालुक्यात आपली ताकद नाही,ही जागा कोसला सोडावी,असा चुकीचा मॅसेज दिला.प्रत्येक वेळेस आमच्यावर अन्याय होत आहे.गेल्यावेळी जि.प.परिषदेत तर यावेळी विधानसभेत अन्याय झाला.धुळे शहरात देखील पक्षातील निष्ठावंतांना डावलण्यात आले.तर कैलास ठाकरे यांनी सांगितले की,आता २०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवरदेखील गावोगाव लोकांपर्यत जावून जमिनीवर 
शिवसेनेचे कार्य पोहचवून तयारी केली.शिवसेनेची ताकद देखील दिसली.यंदा सहानभुतीची लाट होती.त्यामुळे हिंमत साबळे यांना चांगली संधी होती.मात्र तिकिट कॉग्रेसला सोडण्यात आले.त्यामुळे आम्ही नाराज झालो असल्याने आम्ही उभाटा गटाने शिंदे गटात जाहीर प्रवेश करीत आहोत असे पत्रकारां संबोधीत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध