Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

संकटकाळी पक्षासोबत एकनिष्ठ असणा-या शिंदखेडा तालुक्यातील संदीप दादा बेडसे या निष्ठावंताला अखेर पक्षाकडून न्याय देत दिली उमेदवारी.



निष्ठेला फळ मिळत असते, अगदी त्याचप्रमाणे शिंदखेडा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी फुटीनंतर अख्खा पक्ष अजित दादा यांच्याकडे गेल्यानंतर मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ पणे राहीलेले संदीप बेडसे यांना न्याय देत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर केली आहे.शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी उमेदवारीचा तिढा निर्माण झाला होता,यात भाजपातून आलेले कामराज निकम अजित दादा गटातील ज्ञानेश्वर भामरे यांनी उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकला होता,उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले मात्र अखेर शरदचंद्र पवार यांनी संकटकाळी जो आपल्या सोबत होता,एकनिष्ठपणे आपला झेंडा हाती घेतला होता, त्या संदीप बेडसे यांना उमेदवारी देवून निष्ठेला फळ मिळते हे दाखवून दिले.
संदीप बेडसें हे नवखे उमेदवार असतांना देखील त्यांनी 2014 मध्ये दुस-या क्रमांकाची मते घेतली होती,त्यानंतर सन 2019 च्या निवडणुकीत तब्बल 70 हजार मते घेत शिंदखेडा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेट मंत्री असलेल्या रावलांना कडवी झुंज दिली होती, जयकुमार भाऊ रावल यांचे खंदे समर्थक माजी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम हे रावलांच्या विरोधात गेल्यामुळे यावेळेस संदीप बेडसे यांच्या बाजूने मराठा मतदारांचा कौल असेल असे बोलले जात आहे त्याचाच परीणाम म्हणून ही जागा संदी बेडसेंना उमेदवारी जाहिर झाली आहे, बेडसेंच्या विनंतीला मान देवून तब्बल 23 वर्षानंतर शरद पवार साहेब शिंदखेडा दौ-यावर आले होते त्यावेळीच संदीप बेडसे उमेदवार असतील असे संकेत त्यांनी दिले होते,शिवाय शरद पवार यांना माननारा एक मोठा गट मतदारसंघात असल्यामुळे पक्षाची मोठी ताकद बेडसेंच्या मागे उभी राहणार आहे, शिवाय त्यांचे नातेगोते आणि मित्रपरीवार शिवाय गेल्या वर्षभरापासून संकटकाळी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख मतदारसंघात निर्माण झाली आहे,साधा भोळा आणि सदैव हसतमुख चेह-यामुळे त्यांची जनमाणसात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली असून रावलांचा बालेकिल्ला भेदण्याची जबाबदारी आता शरद पवारांनी संदीप बेडसेंच्या खांदयावर दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध