Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

महायुतीत अखेर बंडखोरी,मोहन सुर्यवंशीचा अपक्ष अर्ज दाखल साक्री विधानसभा निवडणूकित शिंदे गटाला जागा सुटल्याने भाजपात नाराजी




भाजपाचा बालेकिलला असलेला साक्री विधानसभा निवडणूकीत भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने इंजि. मोहन सुर्यवंशी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
मागील पंचवार्षिक ला इंजिनीयर मोहन सूर्यवंशी थोड्या फरकाने पराभूत झाले होते.त्यावेळी विरोधात अपक्ष मंजुळा गावित या निवडून आल्या होत्या.आत्ता साक्री तालुक्यात भाजपची ही जागा असताना देखील आमदार मंजुळा गावित यांनी शिंदे गटातून
उमेदवारी मिळविल्याने साक्री तालुक्यातील भाजपात असंतोष पसरला असून ज्यांनी पाच वर्ष भाजपाचे निस्पृहपणे काम केले.त्यांना ही जागा न मिळाल्याने मोहन सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
यावेळी टि.के.बागुल,शैलेंद्र आजगे,वेडु सोनवणे,धर्मराज सोनवणे,रामदास माळी,मनोज सोनवणे,संदीप देवरे,अरुण बेडसे,देवेंद्र गांगुर्डे,दत्तु बोरसे, प्रविण मावळी,बालु कुवर, सुधाकर कुवर,प्रविण देसले,अंकीत बच्छाव,पंडित महाले,
कल्पेश कोठावदे,महेश दशपुते, विनोद दुकाने,यांच्या सह साक्री तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुर्यवंशी म्हणाले.मी पक्षाचे निष्ठेने काम प्रामाणिक पणे केले,पण महायुतीच्या माध्यमातून साक्रीची जागा शिंदे गटाला मंजुळा गावीत यांनी सोडवून घेतल्याने साक्री तालुका भाजपावर अन्याय झाला असल्याची खंत व्यक्त केली.मात्र साक्री तालुका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा अन्याय सहन न करता अपक्ष फॉर्म दाखल करण्यास केल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध