Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या यादीत 15 उमेदवाराचा समावेश.



मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत ६५ जागांवर उमेदवार जाहीर केले होते दोन दिवसानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या यादीत १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे 
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिल्या यादी राज्यातील६५ उमेदवारांच्या जागांच्या नावाची घोषणा केली होती आत्ता दुसऱ्या यादीत १५ जागांचा समावेश असणारी यादी जाहीर केली आहे महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५जागांवर निवडणूक लढवून. उरलेल्या. जागेवर मित्रपक्ष असणाऱ्या महाविकास आघाडी मधील माकप ,शेतकरी कामगार पक्ष ,आम आदमी पक्ष व. समाजवादी पक्ष यांना जागा सोडण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते मात्र समाजवादी पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केली आहेत त्याच पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे जागा वाटपामध्ये महाविकास आघाडी आता नेमकी किती जागांवर लढते हे आता चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ मशाल की तुतारी लढणार
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावर नेमका कोणता पक्ष लढणार याबाबत अध्यापि अंतिम झाले नसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विद्यमान आमदार महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या मतदारसंघात नक्की शरद पवारांची तुतारी वाजणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल पेटणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही मात्र उमेदवार कोण असणार हे देखील गुलदस्त्यात असल्याने जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सोडली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे हे उमेदवार असतील जर ही जागा शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तर वर्धन विधानसभा मतदारसंघात तुतारी  फुंकणार उमेदवार कोण असणार हे देखील अद्याप  गुलदस्तात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवार आदिती तटकरे व 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील याबाबत सावध भूमिका घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या मतदार संघात त्यांची नावे पुढीलप्रमाणे;
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा- (अज) राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध