Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्याचे पाणीदार भावी आमदार इंजि.श्री के.टी.सूर्यवंशी प्रशासकीय जीवन प्रवास.
साक्री तालुक्याचे पाणीदार भावी आमदार इंजि.श्री के.टी.सूर्यवंशी प्रशासकीय जीवन प्रवास.
श्री के.टी सूर्यवंशी है कार्यकारी अभियंता धुळे माळमाथा परिसरात साईट उपलब्ध नुसार सर्वेक्षण करून धरण,लघु तलाव,पाडार तलाव, गाव तलाव,साठवण बंधारे,
आज संपूर्ण साक्री तालुक्याला एक पाणीदार भावी आमदार म्हणून ज्यांची ओळख झाली आहे ते जलसंपदा विभागातील इंजि.श्री के.टी.सूर्यवंशी यांनी संपूर्ण साक्री तालुक्यातील शेतकयांसाठी एक पाणी प्रश्नावर मोठी चळवळ उभी केली आहे. श्री कांतीलाल तुळशीराम सूर्यवंशी उर्फ के.टी. सूर्यवंशी जलसंपदा विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून सन २०२० मध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली असून भाजप पक्ष संघटनेत सक्रिय कार्य करीत आहेत सन २०२१ मध्ये त्यांना तात्कालीन जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण यांनी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करून संघटनेत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली.श्री के.टी सूर्यवंशी यांनी पक्ष कार्यास विशेषल आदिवासी क्षेत्रात स्वतला झोकून दिले आहे आणि उत्स्फूर्तपणे काम करण्यास सुरुवात केली आहे. जलसंपदा विभागात त्यांनी पंधरा वर्षे डेप्युटी इंजिनियर व पाच वर्ष कार्यकारी अभियंता या महत्त्वाच्या पदावर विविध प्रकारचे चांगली कामे करून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, म्हणून सध्या ते तालुक्यातील पाणी प्रश्नावर मोठी चळवळ उभी करीत आहेत. तालुका भर फिरून ज्या भागात जुनी धरणे बांधलेले आहेत ते दुरुस्ती करून गाळ काढून पाणी साठा साठवणे तसेच धरणातील पाण्याची गळती बंद करणे इत्यादी कामे ते स्वतः जलसंपदा, जलसंधारण, मध्यम प्रकल्प, विभाग लघु सिंचन इत्यादी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून गाव तलाव, पाझर तलाव, लघु तलाव,व मध्यम प्रकल्प इत्यादी संबंधित यंत्रणेतील अधिकारी यांना सौबत घेऊन स्वतः साइटवर जाऊन सर्वेक्षण करून
कामे करण्यासंबंधी कार्यवाही करीत तालुका भर
अभियंता या पदावर असताना धुळे जिल्ह्यातील कनोली धरण व विरखेल धरणाच्या सांडव्यावर स्वचलित झडपा (खिड़की) बसवून पाण्यासाठी क्षमता वाढवून नवीन प्रयोग यशस्वी केलेला आहे. त्यामुळे तेथील परिसरातील शेतकऱ्यांना या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. तसेच श्री सूर्यवंशी रावसाहेब यांच्या कार्यकाळात साक्री तालुक्यातील मालनगाव धरण काननदी काठावरील २२ गावांच्या पिण्यासाठी मालनगाव धरणातून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून व त्यांना तांत्रिक बाबी पटवून देऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवून २० दलघफूट एवढा पाणीसाठा जो आधी कधी राखीव होता वा राखीव साठ्चानंतर १० दलगफूट एवढा पाणीसाठा कायमस्वरूपी दरवर्षी त्यांच्या प्रयत्नाने राखीव करून आणला. तसेच चिपली पाद्वा येथील बुराई नदीवरील ब्रिटिश कालीन पद्धतीने बांधलेला मोडकळीस आलेला बंधारा दुरुस्ती करून चिपलीपाडा साठवण बंधारा १ व साठवण बंधारा २ असे गावलगत साखळी पद्धतीने बंधारे बांधून तेथील परिसरातील शेतकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न श्री के.टी.सूर्यवंशी यांनी सोडविला.त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेऊन जळगाव येथील भाजपा आमदार मा.श्री सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगाव येथे श्री के.टी.सूर्यवंशी यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच श्री के.टी सूर्यवंशी यांनी त्यांच्या सेवाकाळात चांगलीच उल्लेखनीय कामे केलेली आहेत, त्यातील सन १९८८ ते २००० या कार्यकाळात कार्यरत असताना नाशिक व धुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पावर सर्वेक्षण
बांधकाम तसेच साक्री नंदुरबार व तालुक्यातील विविध प्रकल्पावर व्यवस्थापनाची कामे त्यांनी केली आहेत.उपविभागीय अभियंता असताना २००१ ते सिंचन २०१५ या कार्यकाळकारात सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसनाची कामे केली तसेच साक्री तालुक्यातील विविध धरणावरील सिंचनाची कामे व पिण्याचे पाण्याचे नियोजन केले. नवापूर तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कोरडी धरणाची कामे फक्त तीनच वर्षात पूर्ण केले व जवळपास ३००० हेक्टर सिंचन हेक्टर निर्माण केले त्याबद्दल शासनाने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र ही दिली आहेत.कार्यकारी अभियंता असताना २०१६ ते २०२० धुळे पाटबंधारे विभागात हजर झाल्यानंतर संपूर्ण धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लहान मोठे
शेतीसाठी सिंचनाचे व पिण्याचे पाण्याचे उत्कृष्ट नियोजन केले व त्यांच्या कार्यकाळात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील धरणावरील लाभदायक क्षेत्राचे जवळपास १००० पेक्षाही जास्त लाभदायक क्षेत्राचे दाखले वितरित केले त्याबद्दल इंजि.श्री के.टी.सूर्यवंशी यांना धुळे जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी श्री पांढरपट्टे साहेब व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कलशेट्टी साहेब यांनी व्यक्तिश त्यांचे कौतुक अभिनंदन केले,
गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढणारे लढाव्या पाणीदार नेता एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण साक्री तालुक्यात ओळख झाली आहे. जलसंपदा विभागातून तापी महामंडळाकडून उत्कृष्ट कामे केली बहुल लागोपाठ चार वर्षे उत्कृष्ट कामाचे प्रमाणपत्र देऊन श्री इंजि.श्री के.टी.सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले आहे शासन सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर साक्री तालुक्यातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे व शेतक-यांच्या शेती सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केलेली आहे.श्री के टी सूर्यवंशी यांची भारतीय जनता पक्षाने नुकतीच अभियंता सेल मध्ये उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे त्यामुळे त्यांना अधिक चांगली कामे करण्याची संधी मिळेल,साक्री तालुक्यातील जनतेने व शेतकरी क्गनि त्यांना साक्री विधानसभेची उमेदवारी करावी असा आग्रवाही धरला आहे.म्हणून श्री के.टी.सूर्यवंशी यांनी साक्री तालुक्यातील जनतेला असे आश्वासन दिले की मला जर साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यास काही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.जसे तालुक्यातील प्रत्येक नवापूर जवळपास १०० धरणावरील शेतकऱ्याऱ्यांना बागायती
बांधण्यात येतील व जुने झालेले सर्व धरणे दुरुस्ती करून त्यातील गाळ काढून त्याला मजबुती करण्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात येईल.तालुक्यातील शेतकयांना आपल्या पिकासाठी उन्हाळ्यात जी पाण्याची वन वन होते ती होऊ देणार नाही त्याच्यासाठी प्रयनशील राहील,व शेतकयांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचा अहोरात्र करील.तसेच काही लोकप्रतिनिधी यांनी सर्रासपणे विकास कामाच्या माध्यमातून भयंकर टक्केवारीने जनतेची लूट सुरू केलेली आहे त्यास आळा घालण्यात येईल व सर्व विकासकामे सामान्य जनतेस समावेश करून पारदर्शकपणे पूर्ण करण्यात येईल.पश्चिम पट्टधातील काबरा खडकच्या धरण दुरुस्तीच्या बाबतीतही श्री के, टी सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली काम हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे अशी कामे माझ्या कार्यकाळात कधीच इराली नाहीत आणि पुढे होणारही नाहीत.मालनगाव धरणावरील पाट चारीचे काम है बऱ्याच दिवसापासून रखडलेले होते त्यामुळे धरण खालच्या क्षेत्रातील व दहिवेल,भोनगाव,किरवाडे ही गावे उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहत होती परंतु श्री सूर्यवंशी साहेब यांच्या प्रयत्नाने ज्या ठिकाणी पाठचाऱ्या फुटलेल्या होत्या त्या ठिकाणी सिमेंट कॉक्रीटचे स्लॅप टाकून पाणी पुरवठा चालू करून दिला.त्यामुळे दहिवेल परिसरातील शेतकरी आनंदी झाला,'दहिवेल व दहिवेल परिसरातील शेतकऱ्यांनी श्री इंजि.के.टी.सूर्यवंशी यांना त्यांच्या या आजच्या वाढदिवसानिमित भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्य...
-
सोनगीर ते दोंडाईचा व दोंडाईचा ते चिमठाणे रस्ता वाहतुक 16 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत राहणार बंदधुळे प्रतिनिधी :- दिनांक 17 एप्रिल, 2025 धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा रस्ता प्ररामा - 1 (भाग किमी 18/880 त...
-
पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमा...
-
महाराष्ट्र राज्य साखर उद्योगासाठी कार्यरत शुगर टास्क फोर्सच्या राज्य कोअर कमिटीच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे मार्गदर्शक...
-
प्रतिनीधी:-गणेश चव्हाण अमळनेरऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने अमळनेर येथील ग्रामरोजगार सहाय्यकांनी का...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा