Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

पर्यावरण रक्षणाचा 'संदेश' विद्यार्थ्यांनी बनविला शाडू मातीचा 'गणेश' स्वराज्य प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम



शिंदखेडा प्रतिनिधी- पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्याचे संस्कार लहान वयातच मिळाले तर त्याची अंमलबजावणी भविष्यात अधिक प्रभावीपणे होऊ शकेल या उदात्त हेतूने आण्णासाहेब एन.डी.मराठे विद्यालयात स्वराज्य प्रतिष्ठान द्वारा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
  
निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो ती माती निसर्गाला समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष श्री अमोल मराठे यांनी केले.
   
शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करणे ही काळाची गरज ओळखून स्वराज्य प्रतिष्ठान द्वारे शिंदखेडा शहरातील आण्णासाहेब एन.डी.मराठे विद्यालयात आर्टिस्ट कुणाल वीर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आकर्षक गणेशाच्या मूर्ती तयार केल्या. तयार केलेल्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना येत्या गणेश चतुर्थीला करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध