Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

सण साजरा करताना कायदा च्या पालन करावे - पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी

       
                
रावेर तालुका प्रतिनिधी :- येणाऱ्या गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण आनंदाने व शांतततेने साजरा करा तसेच नागरिकांनी कायदा चा पालन करावे असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रावेर येथे शांतता समितीची बैठकीत केले .                                  
येणाऱ्या गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणा निमित्ताने रावेर पोलिस ठाण्या मार्फत येथील कमलाबाई  गर्ल्स हायस्कुल जिमखाना हॉल मध्ये शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी डॉ. रेडडी मार्गदर्शन करताना म्हणाले की मिरवणूकीत डिजे न वापरता कोणी उपद्रवी शांतता भंग करत असल्यास त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात यईल. व्यासपिठावर फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह, पोलिस निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल, मुख्याधिकारी स्वालिया मालगावे , नायब तहसीलदार आर के पाटील, महावितरण अधिकारी श्री.मराठे , निभोरा चे स.पो.नि.हरीदास बोचरे ,प स श्री.फेगडे , आदी उपस्थित होते. 


या प्रसगी पदमाकर महाजन , शेख ग्यास,डॉ.सुरेश पाटील, दिलीप कांबळे , अशोक शिंदे ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास डॉ.एस.आर पाटील, सर्वजनिक गणेश मंडळा चे अध्यक्ष संतोष पाटिल,डॉ.राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर महाजन , शेख महेमूद , कपील महाराज , डॉ. नूर मोहम्मद , मौलाना हाफीज अखतर ,युसूफ खान, सुरेश पाटील , मंजूर टेलर , असदउल्ला खान, अड योगश गजरे , बाळू शिरतुरे , सैय्यद आरिफ ,नितीन पाटील, यांचे सह गणेश मंडळाचे पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रईस सर यांनी केले .आभार पो नि डॉ विशाल जयस्वाल यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध