Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

श्री हनुमान व्यायाम शाळेत आधुनिक व्यायाम साहित्य लोकार्पण सोहळा संपन्न...!



शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुपयाचे  व्यायाम साहित्य अनुदान म्हणून उपलब्ध करून दिले त्याचा लोकार्पण समारंभ मा.आ.काशीराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष मा.भुपेशभाईसो पटेल, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार भाऊ रंधे,धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र भाऊ पाटील, धुळे जिल्हा क्रिडा अधिकारी एम.के. पाटील यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,शिरपूर विधानसभा प्रमुख के.डी.पाटील , जिल्हा कुस्ती संघाचे कोषाध्यक्ष शामकांत ईशी, शिवसेना उप जिल्हा उप प्रमुख राजु टेलर, महाराष्ट्र परिट समाजाचे प्रदेश मा.अध्यक्ष एकनाथ बोरसे,माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ माळी, नगरसेवक वासुदेव देवरे,शिरपूर शहरातील उत्कृष्ट जिम चालवणारे राजेश सोनवणे, बहुजन समाजाचे माजी नगरसेवक श्री प्रताप सरदार, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री अरुण धोबी, श्री दगा माळी, श्री युवराज माळी, व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचा हस्ते संस्थापक विश्वस्त यांना पुष्प अर्पण करून दिप प्रज्वलन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.दिलीप लोहार यांनी केले मा.भुपेशभाईसो पटेल व जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी संस्था आजपर्यंत करीत असलेल्या कार्याचा गौरव केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा विचार धारेवर उभी असलेली संस्था आज एक चांगली ज्युनियर सिनियर के.जी.ते इ.१० पर्यंत ची शाळा ,व्यायाम शाळा व सार्वजनिक उपक्रम करीत आहेत हे संघाचा विचारांचे सांघिक यश आहे
व्यायाम शाळेतील भावडया पहेलवान , राज्य व जिल्हा स्तरावरील चांगली कामगिरी करणारे १५ पहिलवानांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री संजय अग्रवाल, श्री राधेश्याम गुप्ता, सौ.कल्याणीदेवी बिर्हाडे, श्रीमती शोभाताई सोनवणे, श्री राजेन्द्रसिंग राजपूत श्री महेश लोहार उपस्थित होते .विजय बागूलसर, यांनी सुत्र संचलन तर पी.एच.देवरे सर यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध