Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

शिरपूर येथील गणेश जैन यांची धुळे जिल्हा शासकीय समितीवर विशेष वर्णी



शिरपूर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी धुळे जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.
 
या समितीवर शिरपूर येथील भारतीय जनता पार्टीचे जैन समाज प्रकोष्ठ आघाडी जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गणेश जैन यांची यशस्वीरित्या वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तर गणेश जैन यांनी समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार मंगलचंद प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जैन समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीतून धुळे जिल्हा शासकीय समितीवर गणेश जैन यांची निवड ललित गांधी यांच्या शिफारशीनुसार झाल्याचे संदीप भंडारी यांनी सांगितले. त्या विषयाचे पत्रक नुकतेच गणेश जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे जिल्ह्यातून एकूण नऊ सदस्यांवर जबाबदारी सोपविल्याचे भंडारी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी ही समिती नेमली आहे. वर्षभरातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानमाला शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा संबंधित शासकीय विभाग निमशासकीय विभाग शैक्षणिक संस्था शाळा व्यवस्थापन जैन संघ यांच्याशी समन्वय करून पुढील कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी या समितीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गणेश जैन यांची शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल समाज बांधवातून व मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर समितीच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल, असे गणेश जैन यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध