Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

आंबेडकरी व्हाईस मेडिया फोरम पत्रकार संघटनेच्या राज्य सचिव पदी देवचंद्र समदूर



शेगाव प्रतिनिधी: उमेश राजगुरे 
गेल्या नऊ दहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार देवचंद्र समदुर यांची आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनचां वर्षाव होत आहे पत्रकारिता क्षेत्रात खंबीर भूमिका निभवणारे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी बरेच वेळा आपल्या लेखणीतून आणि निवेदनातून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे पत्रकारांना पत्रकारिता करताना येत असलेला अडचणी तसेच अनेक विषयावर मार्गदर्शन मिळण्याकरता त्यांनी राज्यस्तरीय कार्यशाळा शेगाव मध्ये आयोजित केली होती.
 
सदर कार्यशाळेला पत्रकार क्षेत्रातील दिग्गज संपादक, पत्रकार, न्यायालयीन वक्ते,राजकीय व सामाजिक कार्यकर्ते बोलाविले होते त्यांचे खंबीर नेतृत्व व कार्याची दखल घेत आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम चे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे यांनी पत्रकार संघटनेच्या राज्य सचिव पदी त्यांची नियुक्ती केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध