Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

आमदार मंजुळा गावित यांच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत प्रहार घटनेची बैठक संपन्न



आज रोजी साक्री तालुक्यातील दिव्यांगांचा अनेक विविध प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली साक्री तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या शिष्टमंडळाची बैठक साक्री तहसील कार्यालय येथे पार पडली
 साक्री तालुक्यातील दिव्यांगांचा संदर्भात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित होते परंतु आमदार ताई गावित यांच्या अध्यक्षस्थानी राहून सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्ष्याची व प्रहार दिव्यांग संघटनेचे शिष्टमंडळाच्या उपस्थितीत विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले व आश्वासन देण्यात आले
 यावेळी तहसील कार्यालय येथील संजय गांधी निराधार,श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार तसेच पुरवठा विभाग येथील रेशन संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले तसेच पंचायत समितीतील दिव्यांग शेषफंड व दोनशे स्क्वेअर फुट जागा घरकुल योजना,रोजगार हमी योजने मधून दीडशे दिवस काम देणे, सिंचन विहीर,गाय गोठा इतर विविध योजना चा लाभ दिव्यांगांना प्रथम प्राधान्याने देण्यात यावा तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दिव्यांगांच्या तक्रारींची दखल घेणे संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय संदर्भात तालुक्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी शासकीय विश्रामगृह,बस स्टॅन्ड,दवाखाने सर्व ठिकाणी रॅम्प व व्हीलर चेअरची सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद समाज कल्याण शेषफंड वितरित करणे बीज भांडवली कर्ज योजना खर्चिक व वेळखाऊ आहे तसेच कर्ज मर्यादा दीड लाख वरून पाच लाख पर्यंत करणे तसेच सरळ व तात्काळ स्वरूपात दिव्यांना कर्ज उपलब्ध करून देणे संदर्भातील शिष्टमंडळाचा विषय झाला यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून आमदार ताईंनी आश्वासन दिलेले आहे
 यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका विभाग प्रमुख जयेश बावा,प्रहार दिव्यांग संघटनेचे साक्री तालुका अध्यक्ष संजय पाटील,उप तालुका अध्यक्ष नाना शेलार,साक्री शहराध्यक्ष राहुल नांद्रे,सोशल मीडिया अध्यक्ष शशिकांत अहिरराव,तालुका संघटक महेश नांद्रे,तालुका संपर्कप्रमुख सोमनाथ सूर्यवंशी,शेतकरी संघटना अध्यक्ष योगेश जाधव, विद्यार्थी संघटना अध्यक्ष मुकेश काकुस्ते,काटवाण परिसराध्यक्ष नरेंद्र पगारे,युवराज मराठे,प्रदीप सोनवणे,बबलू चौरे,लक्ष्मण माळी,सागर बावा, कैलास शेवाळे इत्यादी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध