Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माझी मंत्री जयंतराव पाटलांनी धुळ्यात येऊन सगळा डाव विस्कटून टाकला ?



धुळे प्रतिनिधी :- काल धुळे शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली, यात्रेत जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आणि त्यांचं सोबत पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते,या शिवस्वराज्य यात्रेतील सर्वंच यात्रेकरुनी धुळ्यात येऊन काय साध्य केले याची चर्चा सुरू झाली आहे,येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी ही सगळी उठाठेव करतांना आपली यात्रा भलत्याच मार्गाने भरकटत जात तर नाही ना ? याचे जयंत पाटील,खा अमोल कोल्हे यांना भान असले पाहिजे,हा प्रश्न उपस्थित करण्या मागे हेतू हा आहे की आपण पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांला निवडून आणा या साठी तुमची शिवस्वराज्य यात्रेचा हेतू आहे,पण धुळे शहर मतदारसंघात मात्र आपली यात्रा भलतीकडेच भरकटलेली दिसली,जयंत पाटील खा.अमोल कोल्हे आणि त्यांची शिवस्वराज्य यात्रा सरळ ज्यांचा पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नाही,ज्याचे कोणाशीच देणंघेणं नाही, अशा सचिन दहितेंच्या घरी जाऊन धडकली आणि शहरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले,या चर्चेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुख उमेदवारांचे मनसुबे तुमच्या सचिन दहितेंच्या भेटीने जमिनदोस्त करुन टाकले,जयंत पाटील खा.अमोल कोल्हेंनी सचिन दहितेंच्या रुपात असे काय पाहिले त्यांच्या साठी संकटकाळी पक्षांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे पाप जयंत पाटलांनी केले,जयंतराव तुम्ही इतके निर्दयी कधी पासून झाल्यात ? सचिन दहितेंच्या घरी तुम्ही गेलात,जा या बद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही,पण आपण अशा वेळी सचिन दहितेंच्या घरी गेलात ती वेळ चुकीची निवडली ? निवडणुकी नंतर जयंत पाटलांनी तुमचं इस्लामपुरचे अंथरुण पांघरुण घेऊन सचिन दहितेंच्या घरी मुक्कामाला गेले असते तर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही ? देवेंद्र फडणवीसांनी तुमचं घर फोडलं त्याच्याशी तुमची दुश्मनी काढण्यासाठी,कोणाच्याही घरी जाणार का? तुमच्या या भानगडीत संकटकाळी सोबत असलेल्या रणजीत राजे भोसले सौ कल्पना ताई महाले याचा बळी कशाला देता ? तुम्ही चुकीच्या वेळी त्यांच्या घरी गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढील विधानसभेचा धुळे शहराचा नवा चेहरा अशा चर्चेला उधाण आले,ह्या चर्चेला उत्तर देण्याची हिंमत जयंतराव तुमच्यात आहे का,? धुळे विधानसभेची जागा कोणाला मिळेल याचे अजून ठरवायचे बाकी आहे या जागेवर शिवसेना उबाठा आणि समाजवादी पक्ष यांनी ही जागा आम्हाला मिळावी असा दावा केला असतांनाच आपल्या यात्रेने सगळं गणित बिघडवून टाकले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रणजीत राजे भोसले,सौ कल्पना ताई महाले यांनी उमेदवारी मागितली ही त्यांनी चूक केली का ? रणजीत राजे भोसले,सौ कल्पना ताई महाले संकटकाळी पक्षांच्या पाठीशी उभे राहिले त्याची बक्षीस जयंतराव अशा प्रकारे आपण देत असाल तर भविष्यात पक्षासाठी प्रामाणिक पणे कोण काम करेल ? संकटकाळी कोण पक्षांच्या पाठीशी कोण उभे राहिल ? निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी तुम्ही पक्षातील जेष्ठ नेते देत असाल तर मग तुम्हाला सोडून गेलेले अजीत पवार छगन भुजबळ हे शहाणे ठरलेत,आणि रणजीत राजे भोसले यांच्या सारखे निष्ठावान कार्यकर्ते मुर्ख आहेत अशाच यातून अर्थ निघू शकतो ? मग तुम्हाला धुळे शहरात सहानुभूती तरी कशी मिळेल ? तुमची सचिन दहितेंच्या घरी भेट देणे म्हणजे "हातचे सोडून पळत्याच्या पाठी मागे लागणं"हे सुत्र पक्षाला घातक ठरणार हे मात्र निश्चित ? शहरात इर्शाद जहागिरदार ह्यांनी लखनऊ येथे अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला,त्यांना अखिलेश यादव यांनी धुळ्यात उमेदवारी देण्याचा शब्द दिला,उबाठा शिवसेनेचे डॉ सुशिल महाजन,प्रा शरद पाटील आणि इतर ही उमेदवारी साठी प्रयत्न करतांना, धुळ्याच्या जागेवर दावा केला आहे,अजून जागा कोणाला मिळेल याची ग्यारंटी नाही,महाराष्ट्रात उध्दव ठाकरे शरद पवार आहेत तसे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मोठे बाहुबली राजकारणी म्हणून ओळखले जातात,अशा बाहुबली राजकारणी नेत्यांची "जागा कोणाला"या वर रस्सीखेच होणार असेल तर,जयंत पाटलांनी सचिन दहितेंच्या घरी भेट देण्याची उठाठेव कशासाठी करावी ? राजकारण केव्हा कसे वळण घेईल याची ग्यारंटी कोणी देऊ शकत नाही,भविष्यात धुळ्याची जागा मिळत नाही म्हटल्यावर मग जयंत पाटलांची वक्रदृष्टी जनरल जागा असलेली शिंदखेडा कडे वळेल,मग राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसेंनी करायचं काय ? महाविकास आघाडीत जागावाटपाची रस्सीखेच सुरू आहे त्यात खा.संजय राऊतांनी २८८जागेवर लढायची आमची तयारी आहे अशी धमकीच दिली आहे,मग सचिन दहितेंच्या घरी भेट देण्याची जयंत पाटलांनी एवढी घाई कशासाठी केली ? जयंत पाटलांनी पक्षाचे गणित बिघडवले,पण इतरांचा डावही विस्कटून टाकला,जयंत पाटलांनी धुळ्यात येऊन काय साध्य केले ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध