Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

मी अनुभवलेले आदर्श शिक्षक- सुजित बाळासाहेब देशमुख (सर)

नमस्कार,
आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. ते एक उत्तम शिक्षक होते आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मी अनुभवलेले आदर्श शिक्षक सुजित बाळासाहेब देशमुख (सर) यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करते. मी ईश्वरी दयानंद पाटील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, बार्शी या शाळेचे विद्यार्थिनी असून राज कोचिंग क्लासेस, परंडा या नामांकित क्लासची विद्यार्थिनी होते. मी शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राज कोचिंग क्लासेस, परंडा या ठिकाणी वर्ष २०२३-२०२४ या कालावधीमध्ये सुजित देशमुख (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते.महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुजित बाळासाहेब देशमुख (सर) हे आमचे शालेय स्पर्धा परीक्षेचे शिक्षक होते. त्यांची गणित व बुद्धिमत्ता हे दोन विषय शिकवण्याची पद्धत अत्यंत प्रभावी आहे. ते प्रत्येक धडा अगदी सोप्या आणि सहजतेने समजावून देतात. उदाहरणांच्या माध्यमातून ते अवघड संकल्पनांना देखील  सोप करतात. त्यांच्या व्याख्यानांमध्ये विविधता असते – कधी गोष्टी, कधी चित्रे, कधी प्रात्यक्षिके. या सर्व पद्धतींनी विद्यार्थी त्यांच्या शिकवणीत अधिक रस घेतात. तसा गणित विषय हा सर्वांसाठी अवघड असणारा विषय होता, परंतु सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे हा विषय आमच्या क्लास मधील सर्व विध्यार्थ्यांना गणित विषय खूप सोपा झाला. गणित हा विषय शिकवत असताना हातामध्ये एकदाही पुस्तक न घेता शिकवल्यामुळे आमची गणितातली आवड वाढली. गणिताचे सूत्र समजावून घेणे, शिकविलेल्या क्रमवार पद्धतीने गणिते सोडविणे, आलेख आखणीमध्ये प्रमाणाचे असलेले महत्व तसेच अनेक बारीक गणिती क्रियांमुळे या विषयाची आमची आवड अधिकच वाढत गेली. मला असा अनुभव आला सुजित देशमुख (सर) हे माझ्या जीवनातील आदर्श शिक्षक आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांचे अनुशासनबद्ध आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व, आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले योगदान हे सर्व आम्हाला प्रेरणा देतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. श्री.सुजित सरांच्या शिकवणीमुळे आम्हाला ज्ञान आणि नैतिकतेची योग्य दिशा मिळाली आहे. ते आमच्या हृदयात सदैव आदर आणि प्रेमाने स्थान घेतलेले आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे आम्हाला आपले भविष्य उज्ज्वल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मला गणित विषय अवघड जात होता पण सुजित सरांचे क्लासेस लावल्यापासून गणित विषय हा खूप सोपा जात आहे, तसा गणित विषय हा सर्वांसाठी अवघड असणारा विषय होता, परंतु सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे आमच्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना गणित या विषयाबद्दल आवड निर्माण झाली व गणित सोपे जाऊ लागले.सुजित देशमुख सरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अनुशासनबद्ध आणि आपुलकीचे आहे. ते नेहमी वेळेचे पालन करतात आणि विद्यार्थ्यांनाही वेळेची किंमत समजवतात. त्यांची आपुलकी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करते. ते प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्तिगत प्रगतीकडे लक्ष देतात आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात. त्यांच्या अनुशासनाने आणि आपुलकीने विद्यार्थी त्यांच्याशी जोडलेले राहतात.

(सर) केवळ  शैक्षणिक किंवा शिक्षण देत नाहीत तर नैतिक मूल्यांचे शिक्षणही देतात. त्यांनी आम्हाला सदैव सत्य बोलण्याचे, प्रामाणिक राहण्याचे आणि इतरांचा सन्मान करण्याचे महत्त्व शिकवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केवळ शाळेतच नव्हे तर जीवनातही उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करतो. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्टता व यश परंपरा तसेच सुजित देशमुख (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २०१३ पासून ते आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत एकूण २६ विद्यार्थ्यांची निवड, २०१७ पासून ते आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसेच सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील निकाल अव्वल आहे. या गुणवत्तेमुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी परंडा तालुका युवा पत्रकार संघ व कर्मवीर परिवार परंडा यांच्या वतीने सुजित बाळासाहेब देशमुख (सर) यांना महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुजित देशमुख (सर) हे स्वतः जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.खरंतर शिक्षक हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. तेच आपले चारित्र्य घडवतात, आपली जिज्ञासा वाढवतात आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरणा देतात. त्यांचा प्रभाव वर्गाच्या पलीकडे जातो; ते आपले विचार, आपली मूल्ये आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दलच्या आपल्या धारणांना आकार देतात.

"विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा, किती उपकार मानू गुरूंचे कळत नाही मला...."
" भाग्य होतं म्हणून गुरु लाभला, ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला.."
"ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे कळतो..."
"काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर, आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही ऋण..."
अशा माझ्या आदर्श शिक्षकाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
                     शब्दांकन -ईश्वरी दयानंद पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध