Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

जामनेर विधानसभा मतदार संघातून माजी पोलीस उपनिरीक्षक मदन चव्हाण भारतीय जन सम्राट पार्टी च्या वतीने निवडणूक लढणार -- भाऊसाहेब बावणे



जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) जामनेर विधान सभा मतदार संघाची निवडणूक लढणारे मदन चव्हाण हे लिहेदिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील निवासी असून ते माजी  पोलीस उपनिरीक्षक आहेत.मदन सिंग चव्हाण भारतीय जन सम्राट पार्टी च्या वतीने जामनेर विधानसभा निवडणूक लढणार  असल्याची  माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील,जामनेर विधानसभेचे उमेदवार मदन सिंग शंकर चव्हाण ,महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष विजय करवंदे, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्यासह पक्षाचे नेते व पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते मदन सिग चव्हाण हे समाज सेवक असून त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे या पूर्वी त्यांनी जनतेच्या प्रश्ना करीता अनेक जन आंदोलनात भाग घेतला असून सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात त्यांच्याकडे राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रभारी पदाची जबाबदारी असून या सोबतच महाराष्ट्र कर्मचारी सेवा स्वस्थां जळगाव जिल्हा अध्यक्ष,म्हणून ते कार्यरत आहेत त्यांनी आपली पूर्ण सेवा पोलीस दलाला दिली असून मनमिळाऊ व कार्यतत्पर नेते म्हणून त्यांची मतदार संघात ओळख आहे त्यांच्या उमेदवारीने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून या निवडणुकीत अखिल भारतीय बंजारा सेना तसेच राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल त्यांना सहकार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.लवकरच जामनेर विधान सभा मतदार संघाचा दौरा करून जनतेच्या भेटी घेणार असल्याचे मत मदन सिंग चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध