Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

साक्री शहरात वाढती गुन्हेगारी व अवैद्य धंदे रोकण्याचे पोलिसांसमोर आव्हान



साक्री तालुक्यातील कावठे गावाचे माझी सरपंच व विध्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्यावर साक्री शहरात जीवघेणा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात गायकवाड हे जखमी झाले.या मारहाणीच्या निषेधार्थ आज कावठे ग्रामस्थांसह साक्री तालुक्यातील नागरिकांनी साक्री शहरात विराट मोर्चा काढला.'नही चलेगी,नही चलेगी... गुंडागर्दी नहीं चलेगी'यासारख्या घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते. यावेळी जीवघेणार हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.यासंदर्भात साक्री तहसीलदार रावसाहेब सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
आज सकाळी शहरातील शासकीय विश्रामगृहापासून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.या मोर्चात तालुक्यातील पुरुष,महिला व लहान मुले प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.तहसीलदारांना निवेदनात म्हटले आहे की,कावठे फाटा येथे रहिवास साठी 
परवाना असलेल्या जागेत शुभम चव्हाण,रविंद्र सुळ,कुणाल सरक यांनी हॉटेल व्यवसाय सुरु केलेला होता.या हॉटेलमधील लॉजींगमध्ये अल्पवयीन मुली आणल्या जात असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.या कृत्याला विरोध म्हणून कावठे ग्रामपंचायतने ठराव मंजुर करुन वरील तिघांना समज दिली.मात्र, तिघांनी ग्रामपंचायत सदस्य
योगेश गायकवाड यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली.याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदनही दिले होते.मात्र,प्रशासनाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही.त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास साक्री शहरातील बसस्थानक आवारातील गोल्डी पान शॉप चौकात शुभम चव्हाण,रविंद्र
सुळ,कुणाल सरक यांच्यासह अन्य १० ते १२ जणांनी कावठेचे ग्रा.पं.सदस्य योगेश गायकवाड यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.यावेळी कोयता,कुन्हाड,तलवार अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला.या हल्ल्यात योगेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून.या घटनेनंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.परंतु,फिर्यादीत आरोपींची नावे वगळण्यात आली.तसेच त्यांच्यावर अवैध व्यवसायाबाबत कोणतेही कलम लावले नाही.त्यामुळे फिर्यादीमधील सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर इतरही गुन्हे आहेत का,याची तपासणी करावी तसेच अवैध व्यवसाय,प्राणघातक हल्ल्याचे वाढीव कलम लावून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.साक्री शहरांत सन उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सार्वजनिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 तरुण गर्जना न्यूज चैनल धुळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव.मो 9834568855

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध