Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांचे विविध पुरस्कार जाहीर शिक्षण, राष्ट्र सेवा व आरोग्य सेवेचा सन्मान!



शिरपूर प्रतिनिधी :- गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे विविध उपक्रमातून तालुक्याचे नाव लौकिक करणारी  ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी या सेवाभावी संस्थेकडून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रमशील काम करणाऱ्या शिक्षकांना दि 12 सप्टेंबर 2024 या दिवशीच्या 'ज्ञानदिप आदर्श शिक्षक पुरस्कार" व सेवा पुरस्कार  देवून गौरविण्यात येणार आहे.

    
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील कुरखळी स्व. दीपक मोरे (शिक्षक) व स्व. निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून *ज्ञानदीप आदर्श शिक्षक* पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2024 - 25 या वर्षाचे पुरस्कार पुढील प्रमाणे 
१) श्री विजय दिवाळ्या कोकणी - जि. प. शाळा, बाटवापाडा ता. शिरपूर
२) डॉ. इफ्तेखार अहमद रशीद सैय्यद -आर सी पटेल उर्दू प्राथमिक शाळा, शिरपूर, 
३) श्री राजेसिंग दुरसिंग पावरा - नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रं. ३ शिरपूर, 
४) श्रीमती. प्रतिभा हिरालाल भदाणे - आर सी पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरपूर, 
५) श्री विनोद ओंकार माळी - आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर, 
६) श्री चुनीलाल शिवलाल पावरा -  क्रीडा प्रशिक्षक -  मुकेश आर पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल 

दुसर्‍या गटातला सेवा पुरस्कार  -  १) लान्स नायक स्व. शहीद मनोज संजय माळी -(राष्ट्र सेवा पुरस्कार) - यांचे आई वडील श्री संजय बुध माळी वाघाडी, 
२) श्रीमती. माग्रेट मार्टीन गौंडर - ( आरोग्य सेवा पुरस्कार) ANM - आरोग्य उपकेंद्र, बभळाज),   
३) श्री भूषण सुभाष मोरे -(आदर्श कला सेवा पुरस्कार) -  एच आर पटेल कन्या विद्यालय, शिरपूर, 
4) श्री दिनेश कुमार रतनचंद राणा - (प्रशासकीय सेवा) मुकेश भाई आर पटेल मुलामुलींची सैनिकी शाळा, तांडे, 
 
तिसरा गटातला पुरस्कार 

शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारे स्व. हिरामण कुंभार गुरुजी यांच्या कार्यास नमन करून स्व. हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 1) श्री. राजेंद्र यशवंत पाटील, जिल्हा परिषद प्राथ. शाळा, बुडकी ता. शिरपूर 

चौथा गटातला पुरस्कार 

तालुक्यातील युवा तंत्रस्नेही शिक्षकांप्रती युवकांना प्रेरणा देणाऱ्या स्व.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ  युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक* पुरस्कार 1) श्री समाधान पालसिंग राजपूत, डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश मिडीयम स्कूल शिरपूर, यांना जाहीर झाला आहे. 

सदर पुरस्कारांची निवड 

करण्यासाठी संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्यी निवड समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीकडे महाराष्ट्रातून एकूण 28 प्रस्ताव विविध क्षेत्रातून प्राप्त झाले होते. त्यातून वरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध