Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

नवागांव येथे बैल पोळा आदिवासी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला साजरा....



शिरपुर प्रतिनिधी : तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथे आदिवासी सण उत्सव असलेला बैलपोळा सांस्कृतिक वाद्य ढोल - मांदल ने मिरणुक काढुन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला... 
  
सर्व प्रथमता नवागांव गावाचा मुख्य प्रवेश द्वार येथे गावातील सर्व बैलांची पोळ्याच्या पुजा करण्यात आली त्या नंतर गावातील गाव दैवत हनुमान मंदिर येथून आदिवासी पारंपरिक वाद्य ढोल वाजंत्री ने मिरवणूक गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी बुडकी, बुडकी गावातील हनुमान मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली... 
  
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या कृषीक्षेत्रात बैलांचं म्हणजेच शेतकऱ्यांचा प्राणीमित्रांचं विशेष योगदान आहे. त्यामुळे नवागांव येथे बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून साजरा केला जातो. पोळाच्या दिवशी बैलांच्या जोडीची शेतकऱ्यांकडून पूजा केली जाते. त्यांना सजवलं जातं. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशाप्रकारे त्यांच्या योगदानाची दखल आणि बैलांप्रती असलेलं प्रेम शेतकरी दाखवतात.
   
या वेळी :- जितेंद्र पावरा, लक्ष्मण पावरा (पो.पाटील) खंडु पावरा, मंगल पावरा, अजय पावरा, बन्सीलाल पावरा, अनिल पावरा, जयदास पावरा, किसन पावरा, रमेश पावरा,तसेच गावातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची आंनद घेतला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध