Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

खुनातील आरोपीना २७ पर्यंत पोलीस कोठडी



अमळनेर प्रतिनिधी : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.अवघ्या तीन तासात पोलिसांनी उलट तपासणीत आणि एलसीबी च्या मदतीने तांत्रिक बाबीच्या साहाय्याने मंगल घोगले व करण घटायडे हेच आरोपी असल्याचे निष्पन्न केले होते. करण याला त्याचदिवशी रात्री अटक करण्यात आली होती तर मंगल हिला सकाळी अटक करण्यात आली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्या एलमाणे यांनी आरोपीना २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध