Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

सापडलेले बँकेचे पासबुक प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांनी केले मूळ मालकास परत



अमळनेर प्रतिनिधी:- बसमध्ये सापडले पैसे आणि बँकेचे पासबुक पोलिसांसमक्ष संबंधित मालकास परत करण्यात आल्याने या विद्यार्थांचे कौतुक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले आहे.

अमळगाव (ता.अमळनेर) येथील गोटू जगन्नाथ चौधरी (विसपुते) यांचा नातू गुरुहर्ष विनिता चौधरी (सोनार) वय ११ वर्षे हा शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर येथे इ.५ वी शिक्षण घेत असून तो दररोज अमळनेर ते अमळगाव जा ये करतो २९ ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी १ वा. अमळनेर

खवशी बस नं एम एच २० बी.एल. १२०३ मध्ये त्याला खाली पडलेली प्लस्टिक पिशवी दिसली त्यात बँक ऑफ बडोदा अमळनेर, चे पास बुक व रोख रक्कम आढळली. त्याने ते पास बु. खोपरपट (ता.अमळनेर) येथील रहिवासी लालसिंग हिलाल पाटील यांचे आहे.त्यांना बँक मार्फत बोलावून पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास देवरे व ठाणे अंमलदार व मिलिंद बोरसे यांचे समक्ष लालसिंग पाटील यांना दिले. यावेळी आपले पैसे लालसिंग पाटील यांनी व पोलीस निरीक्षक गुरुहर्षचे कौतुक केले व बक्षीस दिले.

प्रतिनीधी
गणेश चव्हाण
अमळनेर जळगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध