Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

विशाल खान्देशचे नेते माझी मंत्री रोहिदास पाटील कालवश आज धुळ्यात अंतिम संस्कार होणार.



दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे 
गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसपासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारापर्यंत झाला.वडिलांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर न्यांनी १९७८ मध्ये कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत प्रथमच आमदार झाले.तेव्हापासून २००९ पर्यंत सलग सात वेळा ते या मतदारसंघात वजयी ठरले.माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.एकनिष्ठ, निष्कलंक,बडाकेबाज निर्णय घेणारे मंत्री म्हणून न्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता.महसूल राज्यमंत्री म्हणून ८२ मार्च १९८६ रोजी त्यांची प्रथमच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली.आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कृषी व फलोत्पादनमंत्री,कामगार,
रोजगार आणि ग्रामविकासमंत्री, पाटबंधारेमंत्री,गृहनिर्माण,पुनर्बाधणी संसदीय कार्यमंत्री,कृषी व पशुसंवर्धन अशा विविध खात्यांचा पदभार सांभाळला. तब्बल २२ वर्षे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.राज्य सरकारने १९९८-९९ मध्ये त्यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव केला
साहेब म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व
पाटील यांचे विकासात योगदान हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया 
इंदापूर : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने खान्देशचे कणखर नेतृत्व लाभलेला सुपुत्र हरपला,अशा शब्दांत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.मंत्रिमंडळात आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले.ते माझे मार्गदर्शक होते.राज्याचे संसदीय कार्यमंत्री असताना त्यांनी आम्हास विधिमंडळ कामकाजातील बारकावे शिकवले,त्याचा पुढे मी संसदीय कार्यमंत्री झाल्यावर चांगला उपयोग झाला,अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.
होता.जिल्हा परिषद सदस्य,धुळे बाजार समितीचे सभापती,धुळे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, जिल्हा बँकेचे संचालक,महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन संचालक,इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह संस्थेचे संचालक अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य,राष्ट्रीय पातळीवरील साहेबांचं काम 
चव्हाण,माजी मुख्यमंत्री शरद पवार,सुधाकरराव नाईक,विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदे भूषविली.माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी,राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत,मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, माजी राज्यपाल बलराम जाखड अशा विविध राज्यांतील नेत्यांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
अक्कलपाडा प्रकल्पाची निर्मिती करण्यात साहेबांचा खारीचा वाटा होता 
संस्थांचे त्यांनी यशस्वीपणे कामकाज सांभाळले.
गांधी परिवाराशी त्यांचे थेट संबंध असल्याने 
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी,राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता. त्यामुळे त्यांचा राज्यातील राजकारणात विशेष दबदबा होता.माजी मुख्यमंत्री शंकरराव
धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून रोहिदास पाटील यांनी धुळे शहर, तालुका आणि जिल्ह्यासह मुंबई, नाशिक येथे शिक्षणाचे मोठे जाळे निर्माण केले.जवाहर शिक्षण प्रसारक संस्था,शिवाजी विद्याप्रसारक संस्था,मुंबईतील जवाहर एज्युकेशन सोसायटी अशा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षणापर्यंत संधी उपलब्ध करून दिली.
धुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मिती साठी 
पाटील यांच्या राजकीय आयुष्यातील अक्कलपाडा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला.अक्कलपाडा प्रकल्प हा माझा श्वास आहे असे ते नेहमीच म्हणत असत.गिरणा पांझण डाव्या कालव्याचे पाणी शिरूड पट्ट्यात आणले.उल्लेखनीय'जवाहर पॅटर्न'ही सिंचन चळवळ ही रोहिदास पाटील यांची संकल्पना होती.खान्देश विकास महामंडळाची स्थापना व्हावी,यासाठी ते आग्रही होते.
धुळे शहरात,जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्था सुरू करून रोहिदास पाटील यांनी धुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली.त्यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी सूतगिरणी सुरू करून धुळे तालुक्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.देशातील अव्वल दर्जाची सूतगिरणी म्हणूनही या सूतगिरणीने लौकिक मिळविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध