Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४
!! पत्र लेखन !! युगकर्त्यास पत्र. (देवाला पत्र )
प्रति.
श्री. युगकर्ता देवा
मु. पोस्ट. देवनगरी
समस्त आकाश, पृथ्वी, पाताळ युगपुरुष.
पिन. शून्य शून्य ooo
विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या त्रास बद्धल.
श्री. देवाधिदेव राजे युगपुरुष देवा.
स. न. वि. वि.
हे प्रभुदेवा जीव निर्माण केला. त्या सोबत मानव प्राणी निर्माण केला. मानव प्राण्या मध्यें आम्ही येतो. सृष्टी कर्त्याने सर्व प्राण्यांचा विचार करून सृष्टी निर्माण केली. तुमच्याकडे युग निर्माण करण्याची जबाबदारी होती आणि आहे. आपण सर्व काळ आपल्या मना प्रमाणे निर्माण केलेत. अगदी सत्ययुग पासून आता कलियुग पर्यंत. कलियुगात लोकशाही चीं गोड्स नावानं सत्ता आमच्या वर लादलीस. विचार आणि संकल्पना लोकशाही चीं खुप छान आहे. पण त्या संकल्पनेस काळिमा फसणारे. राज्यकर्ते आमच्यावर बसवलेत." रोज खोटं बोला रेटून बोला " या प्रमाणे कली मध्ये जनतेला लुटणारे लुटारू सत्ता भोगी पुढे आलेत आणि येताय. जनतेचं रक्त पियुन तर्रर्र झालीत पुढारी, राज्यकर्ते. पैसा कुठं ठेवावा हे त्यांना समजतं नाही. इतकी लूट जनतेची हे करताय आम्ही मरतोय अन पुढारी टाळूवरचे लोणी खातोय असं झालंय.हे देवा कलियुगात लुटारू यांना माफ करतोय तु आम्ही काय पाप केलंय चांगलं वागून जगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आता तुला सांगणं आहे ह्या पापी सर्व जे असतील ते पुढारी यांची पाप घडा भर मग कोणी का असेना कोणत्या पण पार्टीचा असेना त्यांना गाड आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा जनतेतून प्रामाणिक. भ्रष्टाचार न करणारा पुढारी निर्माण कर आणि आमची या युगातून लवकर सुटका कर रे देवा.
"तळे राखेल तो फळ चाखेल " असं म्हणतात लबाड पुढारी."फोडा,तोडा,झोडा, सत्ते साठी साम,दाम, दंड वापर करताय सारी पुढारी. त्यात आम्ही भरडले जातोय.आम्हाला "भीक नको कष्टाचे दाम मिळु दे " गुण्यागोविदात आम्हाला जनतेला राहुदेत. आमच्यातून आमचा विचार करणारे. नितीवन्त लोकं सत्तेत बसूदे रे युगपुरुषा. लवकरात लवकर कली संम्पव आणि सत्ययुग सुरु करावं अशीच मागणी आहे आमची.इतकंच मागणं आहे प्रभुदेवा लवकर पूर्ण कराव्यात मागण्या. जनता कंटाळलीय या सर्वच दृष्ट पुढऱ्यांना. यांचा बंदोबस्त कर हिच अपेक्षा ठेवून पत्र संम्पवत आहे. लिहायला खुप आहे पण या पत्रा सोबत चार पाच पान जोडावी लागतील म्हणून थोडक्यात संपवतो अन थांबतो.©️®️
आपलीच जनता अन जनतेच्या विचारातून
प्रतिनिधी
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. पिन. 425108
मो. 9922239055©️®️
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपान...
-
अमळनेर प्रतिनीधी:- माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप चे वर्ष 2005/2006 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 1...
-
साक्री तालुक्यातील माजी खासदार कै. डॉ. साहेबराव बागुल (भाजप) यांचे लहान बंधु तसेच डॉ.तुळशिराम गावीत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार सौ.मंजुळा...
-
साक्री सन २००१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संघाच्या कट्टर समर्थक माजी आमदार सौ.मंजुळा गावित यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उ...
-
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा अनुशेष भरण्याचे आश्वासन अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांक...
-
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आंबापिंपरी शिवारातील एका शेतकऱ्याच्य शेतात अवैधरित्या गांजाची शेती केल्याने त्या ठिकाणी जळगाव स्थानिक गुन्...
-
आठही आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी* अमळनेर : अमळगाव शिवारात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी तपासात दीपक प्रल्हाद पवार व सुम...
-
माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दाद...
-
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यानी तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा