Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

तरुण गर्जना न्युज बुलेटिन दिवसभराच्या ठळक घडामोडी




तरुण गर्जना न्युज बुलेटिन दिवसभराच्या ठळक घडामोडी 

1)शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मुहूर्त मिळाला २४ सप्टेंबरला होणार सुनावणी होणार.
2)मशीद कमिटीने स्वतः लिहून दिल्याप्रमाणे कारवाई होणारच धारावीतील मशिद प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया.
3)दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना विराजमान; दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची नोंद.
4) विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवाशरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव;दोन्ही पवार गटात वाद वाढण्याची चिन्हे.
5)पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा.
6)आता महिला कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा दिवसांची मासिक पाळी रजा;कर्नाटक सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
7)भारतीय हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती३० सप्टेंबरला स्वीकारणार हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी.
8)विधानसभा निवडणुकीसाठीच वंचितकडून ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना दिली उमेदवारी.
9)पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली धावणार केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले संकेत.
10)माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आमदार एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे केले स्पष्ट.
11)अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती, 696 जागांसाठी प्रक्रिया सुरु.
12) कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर! हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करणार; उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा.
13)मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार.
14) पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
15) ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी,आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार ?
16) तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत चरबी अन् माशाचे तेलाच्या भेसळ झाल्याचे तिरुपती देवस्थान समितीकडून मान्य
17)अजित पवार यांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय; रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम
18)वंचित बहूजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली;वंचितने विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
19)बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामन्यात शतक ठोकत शुबमन गिलची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री ; ११९ धावांची केली नाबाद खेळी
20)'नजर साफ असेल तर फुलवंती तुम्हाला दुर्गा दिसेल';अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित.

तरुण गर्जना न्युज चॅनल धुळे जिल्हा प्रतिनिधी 
चंद्रशेखर अहिरराव. मो.9834568855.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध