Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

वाघाडी सरपंचावर भ्याड हल्ला - शिरपूर सरपंच संघटेनेतर्फे निषेध



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील वाघाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी यांच्यावर गावातील काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला, या घटनेचा तीव्र निषेध करीत शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद तर्फे शिरपूर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

यापूर्वी देखील तालुक्यातील बऱ्याच सरपंचांवर भ्याड हल्ले झाले आहेत. सरपंच हा गावाच्या विकासासाठी राबराब राबत असतो. घरचे काम सोडून गोर गरीब जनतेसाठी आपला वेळ खर्च करतो. परंतु तरीही तालुक्यातील सरपंचावर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय असून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे सरपंच गावात काम करू शकत नाहीत. 

वाघाडी येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून शांतता प्रिय समजल्या जाणाऱ्या शिरपुर तालुक्याला कलंकित करणारी आहे. या निवेदनाद्वारे सरपंच संघटने तर्फे विनंती वजा इशारा करण्यात आला कि हल्ला करणाऱ्या समाज कंटकांनवर कठोर कारवाई व सरपंचांची सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी अन्यथा येत्या काळात सरपंचांना रस्त्यावर उतरावे लागेल. 

निवेदनावर शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष हेमंत सनेर, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष रोशन सोनवणे, वाठोडा सरपंच नारायण कोंडूसिंग चौधरी, सावळदा सरपंच सचिन राजपूत, हिंगोणी सरपंच सोमा भिल, बोराडी सरपंच सुकदेव भिल, कुरखळी सरपंच किरण धनगर, बुडकी सरपंच विश्वास पावरा, गधडदेव सरपंच आत्माराम पावरा, पनाखेड सरपंच खुमसिंग पावरा, चिलारे सरपंच अमोल रविंद्र पावरा जामन्यापाडा माजी सरपंच सरदार पावरा यांच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध