Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

माझी आमदार स्व.गोजरताई भामरे यांच्यानंतर साक्री तालुक्यात विकासाची गंगा आणणाऱ्या दुसऱ्या महिला आमदार सौं.मंजुळाताई गावीत.



भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या तर तालुक्याच्या विकासात कुणीही महत्वाचे व कार्यसम्राट आमदार असे योगदान दिलेले नाही त्यानंतर आजतगात केवळ विकासाची गंगा तालुक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम करुन तालुक्यात विकास करुन दाखवण्याचे काम आजचा विद्यमान कार्यसम्राट आमदार सौं मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी केले आहे म्हणून तालुक्याची सुजाण मतदार राजा परत मंजुळात एक गावित यांच्याच पारड्यात मतदान करणार असे आज दिसून येत आहे मित्रहो,विकासासाठी तत्पर असणारा लोकप्रतिनिधी निवडण्यामागे अनेक महत्त्वाचे कारणे असतात.जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता ही महत्वाची गोष्ट आहे.
पुढील काही मुद्दे हे स्पष्ट करतात की पुन्हा विकासाभिमुख लोकप्रतिनिधी का निवडला जातो:
1)स्थिरता आणि सातत्य:
एकच लोकप्रतिनिधी पुन्हा निवडला गेल्यास विकासकामांमध्ये सातत्य राहते.आधीच सुरू केलेल्या प्रकल्पांची पूर्ण अंमलबजावणी होते आणि त्यात अडथळे येत नाहीत.
2)प्रविणता आणि अनुभव.
पुन्हा निवडलेला प्रतिनिधी त्याच्या कामातील अनुभवामुळे अधिक सक्षम असतो.लोकांच्या समस्या आणि गरजांची त्याला आधीच जाणीव असते,ज्यामुळे तो अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेऊ शकतो.
3) विश्वासार्हता
आमदार मंजुळाताई गावित यांनी लोकप्रतिनिधी म्हणून गेली ५ वर्षे चांगले काम केले आहे. त्यांच्यावर जनतेचा विश्वास अधिक आहे,म्हणून अशा लोकप्रतिनिधीला पुन्हा निवडून दिल्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते.
4)स्थानीय विकासाच्या योजना
 विकासाच्या बाबतीत तत्पर असणाऱ्या लोकप्रतिनिधीने आधीच आपल्या मतदारसंघात सकारात्मक बदल घडवले असल्याने,सामान्य जनतेकडुन भविष्यात अधिक विकासकामांची अपेक्षा आहे.
5)प्रभावी नेतृत्व:
आमदार मंजुळाताई गावित यांच्याकडे जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सक्षम असणारे नेतृत्व म्हणून बघितले जाते,त्यांनी केलेले काम आणि घेतलेल्या निर्णयांचा जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी जनता तयार आहे.
अशा कारणांमुळेच,विकासाभिमुख लोकप्रतिनिधी पुन्हा निवडला जातो,कारण तो जनतेच्या हितासाठी काम करण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवतो म्हणून.
तरुण गर्जना न्यूज चायनल धुळे जिल्हा प्रतिनिधी 
 चंद्रशेखर अहिरराव मो. 9834568855.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध