Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

साक्री तालुक्याची राजधानी असलेल्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली



साक्री तालुक्याची राजधानी सबोधल्या जाणाऱ्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सलग चौथ्या वर्षी सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुलकी व प्रेम टिकून रहावे याकरिता एक गाव एक गणपती(राजधानी चा राजा) ही भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.या गणेशउत्सव काळात लहान मुलांसाठी करमणूकीचे कार्यक्रम दररोज घेण्यात येत आहेत, याबरोबर गावातील भजन मंडळाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे आणि दि.12 सप्टेंबर गुरुवार रोजी पूर्ण गावाला महाप्रसाद आयोजित करण्यात आला.गणेश उत्सव काळात गावातील मराठी शाळेच्या आजूबाजूचा परिसर प्रतिष्ठान तर्फे स्वच्छ करण्यात आला व मुलांचे आरोग्य ठिक रहावे यासाठी शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे आणि तशी जनजागृती देखील प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे.दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून गुलाल बंदी करण्यात आली आहे व तालुक्यातील इतर मित्र मंडळाना देखील गुलाल बंदी साठी आग्रह करत आहोत.
दररोज गावातील व साक्री तालुक्यातील सामाजिक,सहकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान सह धाडणे गावाचे कौतुक करत आहे  
सार्वजनिक गणेशउत्सव यशस्वीतेसाठी गावातील बालगोपाल,जेष्ठ सल्लागार,भजणीमंडळ,तरुण व युवती वर्ग,गावातील समाजसेवक आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चे सर्व सदस्य मेहनत घेत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध