Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

साक्री पंचायत समिती सदस्य राजधर देसले (माऊली) व माझी नगराध्यक्ष जयेश नागरे यांची धुळे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड



माजी पंचायत समिती सदस्य राजधर उत्तमराव देसले उर्फ माऊली यांची तसेच साक्रीचे नगरसेवक जयेश नागरे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.राजधर देसले यांनी पंचायत समितीमध्ये स्वतःच मतदान नसताना दुसऱ्यांदा पंचायत समितीवर निवडून आले.अगोदर ते दुसऱ्यांदा त्यांच्या धर्मपत्नी अर्चना राजधर देसले.तसेच त्यांनी सामाजिक कार्यात परिसरात चांगल्या पद्धतीने ओळख निर्माण
केली आहे.म्हणून परिसरात त्यांना माऊली म्हणून ओळखतात ते कायम गोरगरिबांच्या सुखदुःखात तसेच सामाजिक कामात कायम अग्रेसर असतात.माऊली यांनी लोकांचा संग्रह केला आहे त्यामुळे
माऊली यांना परिसरात चांगले मानतात त्यांनी कोरोना काळात तसेच सामाजिक कार्यात कायम तत्पर राहून कायम सेवा देत राहिले त्यामुळे त्यांना सामाजिक सेवेचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
तसेच जयेश नागरे हे साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक असून त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केल्याने जयेश नागरे यांना नियोजन समितीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र भाऊसाहेब चौधरी व आमदार सौ.मंजुळाताई तुळशीराम गावित,शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीरामजी गावित यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच या निवडीबद्ल परिसरातून (माऊली)राजधर देसले व जयेश नागरे यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध