Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १ सप्टेंबर, २०२४
शिरपूर येथील गणेश जैन यांची धुळे जिल्हा शासकीय समितीवर विशेष वर्णी
शिरपूर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी धुळे जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीवर
शिरपूर येथील भारतीय जनता पार्टीचे जैन समाज प्रकोष्ठ आघाडी जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गणेश जैन यांची यशस्वीरित्या वर्णी लागली आहे.
त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तर गणेश जैन यांनी समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
आमदार मंगलचंद प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जैन समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीतून धुळे जिल्हा शासकीय समितीवर गणेश जैन यांची निवड ललित गांधी यांच्या शिफारशीनुसार झाल्याचे संदीप भंडारी यांनी सांगितले. त्या विषयाचे पत्रक नुकतेच गणेश जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे जिल्ह्यातून एकूण नऊ सदस्यांवर जबाबदारी सोपविल्याचे भंडारी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी ही समिती नेमली आहे.
वर्षभरातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानमाला शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा संबंधित शासकीय विभाग निमशासकीय विभाग शैक्षणिक संस्था शाळा व्यवस्थापन जैन संघ यांच्याशी समन्वय करून पुढील कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी या समितीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
गणेश जैन यांची शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल समाज बांधवातून व मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.तर समितीच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल, असे गणेश जैन यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा