Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठेनगर येथे 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..



प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री.सुरेश पाटील सर उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ.प्रवीण शिंगाने आणि त्यांची पूर्ण टीम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोहर सूर्यवंशी हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण फुलपगारे यांनी केले.त्यांनतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजपूजन वस्ती वरील सर्व पालक आणि महिला भगिनी आणि जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते कऱण्यात आले.

झोडगे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .पाटील सर यांच्या हस्ते नारळ व पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. शा.व्य.स. अध्यक्ष श्री मनोहर भाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण कऱण्यात आले

केंद्रप्रमुख श्री पाटील सर, डॉ. श्री. प्रविण शिंगाणे सर व त्यांचे भोई समाज सेना पदाधिकारी मच्छिंद्र फुलपगारे, रोहित शिंगाणे, भिलेशभाऊ खेडकर, विरेंद्र फुलपगारे, ज्ञानेश्वर जाधव व सतिश जी फुलपगारेभोई धुळे यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच विनोबा ॲप पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती मोरे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉ श्री प्रविण शिंगाणे,धुळे यांच्या कडून शाळेसाठी LED TV भेट देण्यात आलीज्ञशाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले,
तसेच *लेक शिकवाज्ञया विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली..
केंद्रप्रमुख श्री.पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त  केले.

कार्यक्रमासाठी देवारपाडे चे मा.सरपंच आण्णासो श्री.बारकु चव्हाण, शा.व्य.स.उपाध्यक्ष श्री.नामदेव वाळके, श्री.पुंजाराम चव्हाण,श्री.अशोक चव्हाण,श्री.कौतिक पठाडे, श्री.अमोल म्हस्के,श्री.मच्छिंद्र पठाडे,श्री. शरद सावंत,श्री.सुरेश चव्हाण,श्री.प्रकाश चव्हाण,श्री.शिवाजी चव्हाण,श्री.वसंत चव्हाण,श्री.नाना सुर्यवंशी,श्री.मोहन काशीद, श्री.भास्कर चव्हाण,श्री. सुदाम सुर्यवंशी,श्री.अभिमान चव्हाण,श्री.रमेश चव्हाण..आदींसहज्ञअंगणवाडी ताई सौ .सुरेखा साळुंखे मॅडम आणि सौ.आशा सूर्यवंशी उपस्थित होते. डॉ.शिंगाने सर, श्री पाटील सर आणि वस्तीवरील दानशूर व्यक्तिकडून रोख पारितोषिके व बिस्कीट चॉकलेट चे वाटप करण्यात आले.

शेवटी श्रीमती.मनीषा मोरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध