Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

24 लाखांचा साठा जप्त; एलसीबी व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई...!



धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्याच्या एकुण तीन कारखान्यांवर छापा टाकत कारवाई केली. तेथे मिरची पावडरमध्ये कृत्रिम रंग, पिठ व इतर तत्सम पदार्थाची मिश्रण करुन बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करण्यासाठी उत्पादन करताना आढळुन आले.

यांच्यावर झाली कारवाई – संयुक्त पथकाने इमरान अहमद अख्तर हुसैन मोमीन याच्या मालकीच्या इमरान अहमद स्पायसेस (ई १००, एमआयडीसी, धुळे), मोहम्मद जैद अहमद जलील अहमद अन्सारी यांच्या जैद मिरची (साहील हॉटेल मागे, चाळीसगाव रोड, ऑलियो स्कुल मागे, धुळे) व मसुद अहमद अब्दुल हमीद यांच्या मोमीन मसाला इंसिटज इंडसटिजवर ( सरदार हॉल जवळ, १०० फुटी रोड, धुळे) कारवाई करण्यात आली. तिघा कारखान्यांची तपासणी करुन विविध अन्नपदार्थचे २५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच एकुण ३२ हजार ५२९ किलोचा साठा जप्त करण्यात आला. त्याची एकुण किंमत २४ लाख ९३ हजार ६८४ रुपये आहे. तिघा ठिकाणी विनापरवाना व्यवसाय सुरु होता. त्यामुळे तिघा कारखान्यांना सील करण्यात आले आहे.

या पथकाची कारवाई- ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांचे पथक व अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं.कृ.कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ. सांळुके, आ. भा. पवार, कि.हि. बाविस्कर व श.म.पवार यांनी केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध