Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर ! 2 कलेक्टर, 8 तहसीलदार & एका "आरटीओ"सह आणखी 359 सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता



प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत.सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे.याशिवाय,एका "आरटीओ"सह आणखी 359 सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे.
खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू आहे.त्यात अशा बनावट प्रमाणपत्राच्या माध्यमातून 359 अधिकारी सरकारी सेवेत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व संशयित अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्व दाव्याच्या फेर तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेल्या संशयित अधिकाऱ्यांच्या यादीनुसार आता ही चौकशी सुरू आहे. 
राज्यात अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे नोकरी मिळवली असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या.या तक्रारींवर योग्य चौकशी केली जात नसल्याचेही आरोप होत होते.त्यानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 19 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहिम अभियान राबवले होते.त्यानंतर बच्चू कडू यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याच्या संशय असलेल्या 359 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे.आजवर त्यांच्या संदर्भातील तक्रारींची योग्य चौकशी केली न जाता ही प्रकरणे दडपली गेल्याचा आरोप आहे.
बच्चू कडू यांनी तयार केलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकामध्ये 2 आयएएस अधिकारी, 8 तहसीलदार,एक कृषी उपसंचालक,एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), एक कृषी उपसंचालक,एक सहाय्यक कर उपायुक्त, एक उपशिक्षणाधिकारी, एक उपजिल्हाधिकारी, एक मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 359 अधिकारी कर्मचारी आता चौकशीच्या रडारवर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध