Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींचा निधी
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींचा निधी
वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील
अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर-महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरे व धार्मिक स्थळी विकास कामे होणार असल्याची माहिती नदीत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्या वतीने ही कामे होणार आहेत.विशेष करून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमळनेर येथील वर्णेश्वर महादेव मंदिरासाठी 50 लक्ष निधी मिळाल्याने हे संस्थांन पर्यटन दृष्ट्या विकसित होणार असून याशिवाय इतर मंदीरांवर सुशोभीकरण सभामंडप व इतर अनुषंगिक कामे होणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
येथे होणार विकासकामे
१)मौजे पाडसे, ता. अमळनेर येथील भवानी माता मंदिर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
२)मौजे झाडी, ता. अमळनेर येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 30 लाख,
३)मौजे दळवेल, ता. पारोळा येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 25 लाख,
४)वनेश्वर महादेव मंदिर ता. अमळनेर जि. जळगांव पर्यटन दृष्टया विकसीत करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 50 लाख,
५)मौजे अंचलवाडी, ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे, जि. जळगाव रक्कम 25 लाख,
६)मौजे बोदडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील शनिमहाराज मंदीर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 5 लाख,
७)मोजे गलवाडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील म्हाळसादेवी मंदीर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
८)मौजे निभोरा, ता.अमळनेर जि. जळगांव येथील राममंदीर येथे सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
९)मौजे मठणगव्हाण, ता.अमळनेर जि. जळगांव येथील विठ्ठमंदीर येथे संरक्षण भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 15 लाख,
१०)मौजे पिंपळे, ता.अमळनेर जि. जळगांव येथील नवनाथ व दत्तमंदीर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 20 लाख,
११)मौजे आटोळे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील भवानी मंदीर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 5 लाख,
१२)मौजे कावपिंप्री, ता. अमळनेर जि. जळगांव येथील लहरीबाबा सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 15 लाख,
१३)मौजे तळवाडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील धनदाई माता येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगक कामे रक्कम 10 लाख,
१४)मौजे जवखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील दत्त महाराज मंदिर येथे डोम सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 20 लाख,
१५)चक्रधर स्वामी महाराज मंदिर रणाईचे ता. अमळनेर जि. जळगांव येथे भक्तनिवास बांधकाम करणे व इतर अनुषंगिक बांधकाम रक्कम 40 लाख,
१६)मौजे ढेकू अंबासण ता. अमळनेर येथील श्रीराम मंदिर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक
कामे रक्कम 10 लाख.दरम्यान सदर निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढ...
-
शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुप...
-
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील वाघाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी यांच्यावर गावातील काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला, या घटनेचा ती...
-
साक्री तालुक्याची राजधानी सबोधल्या जाणाऱ्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सलग चौथ्या वर्षी सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुल...
-
अमळनेर प्रतिनिधी:- मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत एकाच्या घरात घुसून महिलेला मारहाण व तरुणाला देखील मारहाण करून त्याच्या मो...
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या...
-
अमळनेर प्रतिनिधी:- छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील पाचपेडी, मल्हार येथून प्रियकरासह पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला अमळनेर रेल्वे संर...
-
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना अमळनेर प्रतिनिधी - शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्...
-
आधुनिक शेतीत बदल घडतोय आणि बदल घडवूया शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा वचन तत्पर सेवेचे महत्व पटत्तय आणि गरज ही बोलून दाखवली जात आहे.जे पिक...
-
धुळे प्रतिनिधी - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना धुळे जिल्ह्यातून मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. धुळे शहरापासू...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा