Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नाईक महाविद्यालय रावेर येथे विविध स्पर्धांचे आयोजन
रावेर तालुका प्रतिनिधी :- रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.व्ही.एस.नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर येथे 29 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले व व खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.डी.धापसे उपस्थित होते. क्रीडा समिती सदस्य प्रा.सी.पी.गाढे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जिवंत असणे काळाची गरज आहे असे सांगितले. क्रीडा संचालक डॉ.उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.नीता जाधव, डॉ. स्वाती राज कुंडल उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा समन्वयक डॉ.उमेश पाटील व क्रीडा समिती सदस्य प्रा. सी.पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा,तायकांडो,
रग्बी अशा खेळांचा समावेश होता.
संबंधित खेळामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कॅरम स्पर्धा महिला संघ प्रथम क्रमांक कु.निशा पटेल व प्रीती ठाकणे, द्वितीय क्रमांक नंदिनी बारी व राधिका पाटील.
पुरुष संघ प्रथम कु.विशाल तायडे व वंश घोरपडे,द्वितीय भिमराव हिवरे आणि हर्षल पाटील.सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.शिपाई सुनील मेढे यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा