Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

काला या खताचा किंवा काला ड्रीप चा वापर करून जमिनीत सेंद्रिय कर्बाचे नियमित प्रमाण आणि होणारे फायदे



पी.एम. बायोटेक पुणे हे घेऊन येत आहेत सेंद्रिय खतांची मोठी मालिका भविष्यात मानवाला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर ऑरगॅनिक खताचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत वाढवला पाहिजे अन्यथा विनाश अटळ आहे
 
जमिनीत सेंद्रिय कर्बाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते. तसेच होणारे इतर फायदे पाहुयात.

● जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.

● जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

● हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.

● मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.

● रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.

● नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.

● रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.

● स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.

● जमिनीचा सामू उदासीन (6.5 ते 7.5) ठेवण्यास मदत होते.

● आयन विनिमय क्षमता वाढते.

● चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

● जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.

● विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.उदा.युरिएज सेल्युलोज    ..   

सर्व पिकांना काला एकरी 5 लिटर ची ड्रेंचिंग  किंवा ड्रीप द्वारे द्या.व एकदा अनुभव घ्या आणि आपल्या पिकात बदल पहा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध