Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

गोळेगाव बुद्रुक येथील विशाल अरुण समदूर यांचे जलसंपदा विभागात मोजणीदार म्हणून नियुक्ती...



शेगाव प्रतिनिधी: (उमेश राजगुरे)
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब (अराजपत्रित) गट क( सरळसेवा )भरती 2023 अंतर्गत अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ व परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सातारा यांच्या अंतर्गत जलसंपदा विभाग ( WRD) जानेवारी मध्ये परीक्षा घेण्यात आली होते सदर परीक्षेत मेरिट लिस्ट नुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एक जुलै 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आले आणि एक ऑगस्ट 2024 रोजी त्यांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये गोळेगाव बुद्रुक येथील गरीब कुटुंबातील विशाल अरुण समदूर यांची नियुक्ती झाल्याने आई-वडिलांसह गावांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून विशाल वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे 

विशाल हा अतिशय गरीब कुटुंबातील असून आई वडिलांना शिक्षणाचे महत्त्व कळाले असल्याने त्यांनी अर्धपोटी राहून विशालच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे हे ब्रीद वाक्य विशालने आपल्या मनी ठासून घेतलेले होते विशालने आपल्या आई-वडिलांच्या परिश्रमाची किंमत जाणून खूप जिद्द व चिकाटीने अभ्यास करून सदर परीक्षेत यश संपादन केले बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या विशालने आपल्या यशाचे श्रेय बाबासाहेबांचे विचार व आई-वडिलांना दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध