Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

अक्कलपाडा प्रकल्पातून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू



अमळनेर प्रतिनिधी :- पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून 28274 क्यूसेक विसर्गाने पाण्याचा येवा असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून आज दि 26/08/2024 रोजी सद्यस्थितीत 18000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला असून पुढील काही तासांत विसर्ग 32000 ते 35000 क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता असून अक्कलपाडा प्रकल्पातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे, तरी पांझरा नदी काठच्या गावांतील नागरिकांनी तसेच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*


ना.अनिल भाईदास पाटील
मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध