Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना निषेध शिवसेना शिरपूर तालुका व शहर तर्फे निवेदन



आज दिनांक २२/८/२४ गुरूवार रोजी शिवसेना शिरपूर तालुका व शहर तर्फे निषेध, बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदाजनक व भयावह असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे, महिलांचा अपमान, त्यांच्यावरील अत्याचार, महिलांवर बंधने लादने, हे छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवले जाणार नाही, संबंधित दोषीस तात्काळ फाशिची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच शिरपूर तालुका व शहर अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय परिसरात CCTV कॅमेरा बसविण्यात यावे, तसेच नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्य स्त्रोतांव्दारे अथवा कंत्राटी पध्दतीने केल्या जाणाऱ्या नेमणूकीपुर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाव्दारे प्राप्त करून घेणे अनिवार्य करावे, व प्रत्येक शाळेत, माध्यमिक विद्यालयात, महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे व त्या समितीत स्थानिक प्रशासन, पालक, शिक्षक वृंद समाविष्ट करण्यात यावे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि प्रत्येक शिवसैनिक हा महिला बघिणी यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे आणि कायमच राहील.

शिरपूर प्रांत कार्यालय येथे प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. तरी त्यावेळी भरतसिंग राजपूत(उपजिल्हा प्रमुख),राजू टेलर,विभाभाई जोगारांना(उपजिल्हा संघटक),अभय भदाणे(उपजिल्हा संघटक),युवराज पाटील(तालुका प्रमुख),अत्तरसिंग पावरा(तालुका प्रमुख),योगेश सूर्यवंशी(तालुका संघटक),जितेंद्र राठोड(विधानसभा क्षेत्र प्रमुख),अनिकेत बोरसे(शहर प्रमुख),पिंटू शिंदे,मुकेश शेवाळे (तालुका समन्वयक)विकास सेन(विधानसभा समन्वयक)जितेंद्र पाटील(जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना),मंगल भोई,सुनिल मालचे, शरद पाटील,(उपतालुका प्रमुख),देवेंद्र पाटील(शहर समन्वयक)वाजीद मलक(उपशहर प्रमुख),विजय पावरा(युवासेना तालुका युवाधिकारी),जगदीश पावरा(विभाग प्रमुख),होल्या पावरा(उपविभाग प्रमुख),विनोद पाटील जेष्ठ शिवसैनिक प्रकाश पावरा, रविंद्र पावरा,आदी शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध