Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

शाळा (बालगीत)



या रे या..या रे या...
बालगोपाल सारे या 
नव भविष्य घडवाया 
शाळा आपली बांधूया.... |धृ|

ओली माती घेऊन 
भिंत उंच बांधूया 
कालवून चिखलगारा  
हडकावया येई वारा  
चिखलगाऱ्यांनी बांधू 
अंगणात आपली शाळा  
शिकण्याच्या वळणवाटा 
दाखवी शाळेचा फळा 
जगणं मढवायला 
शिकवी आपली शाळा
चिखलगोळयाला आकार देण्या
शाळा आपली भरवूया .....|१|

या रे या...या रे या...
बालगोपाल सारे या 
नव भविष्य घडवाया 
शाळा आपली बांधूया....

वर्गाच्या दाराशी  
एक देवळी बांधूया 
दारातल्या देवळीत 
ज्ञानदीप लावूया
शाळा आमची बगीच्या 
आम्ही छोटी छोटी मुले
शाळेच्या बागेची आहो फुले
शाळेचे मैदान 
फुलांनी सजवूया 
आयुष्याच्या रांगोळीत 
सुंदर रंग भरु या........|२|

या रे या...या रे या ...
बालगोपाल सारे या 
नव भविष्य घडवाया 
शाळा आपली बांधूया....

           लक्ष्मण वाल्डे-कन्नड
           छत्रपती संभाजीनगर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध