Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० ऑगस्ट, २०२४
शिरपुर शहरातील वाल्मिक नगर परीसरात ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा...
शिरपुर प्रतिनिधी :-आजचा दिवस तसा महत्वाचाच कारण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचा दिन म्हणूनच आज देशभर क्रांती दिन साजरा केला जातो.तसेच आज विश्व आदिवासी दिन देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येतो,आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच स्वातंत्र्य संग्रामातील योगदान फार मोलाचे आहे.
शिरपुर शहरातील वाल्मिक नगर परीसरात विश्व आदिवासी दिनानिमित्त
महर्षी वाल्मिकी, क्रांतिवीर राघोजी भांगरे बिरसा मुंडा,भगवान विर एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर समसेरसिंग पारधी यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ समाजसेवक मनोहर वाघ, मोहन मंडाले,भाऊसाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले ..
यावेळी जेष्ठ समाजसेवक मनोहर वाघ यांनी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जिवनपटावर प्रकाशझोत टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की राघोजी भांगरे यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवट उलथवुन इंग्रजांना जसे सळो की पळो करून सोडले होते त्याच प्रमाणे आदिवासी कोळी जमातीला ह्या इंग्रजरुपी शासनास सळो की पळो करून सोडावे लागेल तरच आपल्या आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळेल..
यावेळी उपस्थित असलेले समाज बांधव हिराभाऊ वाकडे,राहुल कोळी,जितु बागुल,समाधान माळी, हिरालाल निकम,मंड्या पारधी, राहुल भोई,नितीन धनगर,सोनु भोई,मुकेश कोळी,चंदु तवर,प्रमोद भोई,रोहित कोळी,संजय कोळी,भारत पारधी,मेहुल लोणारी,मयुर धनगर, सुदर्शन गोसावी,अजय पारधी, योगेश मोरे व परीसरातील नागरीक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा