Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

अखेर शेतकरी सहकारी.संघ लि.साक्री च्या बाद केलेल्या व मयत वारस सभासदांना अखेर मिळाला न्याय ! ऍड. नरेंद्र मराठे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश



सन २०१३ मध्ये सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळाने शेअर्स फी रु. २५/- वरुन रु. १००/- वर वाढवली व ६५०० शेतकऱ्यांना मतदार यादीतुन बाद करुन अन्याय करण्यात आला होता.
या बाबत शेतकरी विकास पॅनलचे विरोधी संचालक ॲड. नरेंद्र मराठे,उल्केश देसले, विलास देसले, नयनेश भामरे व डाॅ.माणिक मारनर यांनी या बाद (अक्रियाशिल) सभासदांनाची उर्वरित रु. ७५/- सभासद फी भरुन त्यांचे सभासदत्व जिवंत करणे, मयत सभासदांचे वारस लावणे करिता जनरल मिटिंग, मासिक मिटिंग मध्ये वेळोवेळी आवाज उठवला, अर्ज दिलेत. त्याला शेवटी दि. २० जानेवारी २०२४ च्या मासिक मिटिंग मध्ये मान्यता देण्यात आली. वेळोवेळी विचारणा करुनही त्याबाबत कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे काल दि.३१ जुलै २०२४ रोजीच्या मासिक सभेत विरोधी संचालक ॲड.नरेंद्र मराठे,श्री.उल्केश देसले,श्री.विलास देसले, श्री.नयनेश भामरे व डाॅ. माणिक मारनर यांनी लेखी अर्ज देऊन मागणी केली.त्याप्रमाणे आज दि. १/८/ २०२४ रोजीच्या दै.पुण्यनगरी मध्ये त्याबाबत जाहिरात/नोटिस प्रसिध्द झाली आहे.याद्या शेतकरी सह.संघात उपलब्ध आहेत.हे शेतकरी विकास पॅनलच्या लढ्याचे यश आहे.
तरी सभासदांना शेतकरी विकास पॅनल तर्फे आवहन करण्यात येते कि,
ज्या सभासदांची शेअर्स फी अपुर्ण असेल त्यांनी दि.१/८/२०२४ ते दि. ३०/८/२०२४ पर्यंत रु. ७५/- शेअर्स फी भरुन आपले सभासदत्व जिवंत करुन घ्यावे.तसेच वारस लावून घ्यावे. हि विनंती
 तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध