Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

ब्रिटिश कालीन फाफोरे वळण बंधाऱ्याच्या फूटचारीस १ कोटी ५३ लाखांची प्रशासकीय मान्यता : प्राध्यापक गणेश पवार यांच्या बैलगाडी मोर्चाला यश

 


अमळनेर i उपसंपादकशामकांत पाटील    

अमळनेरचे मुदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मिळवली प्रशासकीय मान्यता .

 

अमळनेर :  गणेश पवार, शशी पाटील  ,धारवासी व  सर्वच पंचक्रोशीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. ब्रिटिश कालीन फाफोरे बंधाऱ्यासाठी भूमिपुत्र अनिल पाटील यांनी  १ कोटी ५३  लाख इतक्या किमतीची प्रशासकीय मान्यता मिळवली .

 

फाफोरा बंधाऱ्याचा डावा तीरावरील वळण कालवा हा सुमारे ४० वषांपासून बंद होता . या वळण कालव्याद्वारे फाफोरा, अमळनेर शिवारातील शेतीस पूवी सिंचनाचा  लाभ होत होता. सदर वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवुन त्याद्वारे अमळनेर परीसरातील धार मालपूर साठवण तलावात पाणीसाठा करणेसाठी त्या परीसरातील १२ गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी निविदेनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्री अनिल पाटील यांनी शासन दरबारी प्रशासकीय मान्यता मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

प्राध्यापक गणेश पवार व त्यांच्या सहकार्यांनी या कालव्यासाठी अमळनेर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा आणून प्रशासनाला चांगलेच वेटीस धरले होते. बोरी नदी पात्रातील पाणी सदर वळण कालव्याद्वारे धार मालपुर साठवण तलावात आल्यास परिसरातील १२ गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटणार आहे. 

 

यापूर्वी या कालव्याचे पुनर्जीवन करण्यासाठी मारवड विकास मंचाने पूर पाटचारी खोलीकरण करण्याचे काम केले होते.तसेच २०२४ च्या उन्हाळ्यात मारवड विकास मंचच्या आर्थिक मदतीने व धार परिसरातील जनतेच्या सहकार्याने तलावातील हजारो ब्रास गाळ काढून तलावाची खोली व साठवण क्षमता वाढवण्यात आली आहे.तलावातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने  शेतीची सुपीकता वाढून उत्पन्नात भर पडणार आहे. अप्पर आयुक्त संदीपकुमार साळुखे व त्यांचे सहयोगी यांच्या दूरदृष्टीने ही सर्व किमया घडली असून पुढील येणाऱ्या काळात त्यांनी तलावाची खोली व रुंदी वाढवण्याचे नियोजन केले आहे . तलावात साठवण क्षमता वाढल्यास जमिनीतली पाण्याची पातळी वाढून निशितच शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध