Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जुलै, २०२४

शिरपूर येथील दबंग महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांची बदली



शासनाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आणि नागरिकांसमोर सरकार म्हणून सर्वप्रथम दिसणारा घटक म्हणजे पोलीस आहे. सर्वसामान्यांची पोलिसांकडून काय अपेक्षा असते ,तर आपल्या जीवनाचे ,मालमत्तेचे आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे. त्यामुळे नागरिकांना आपल्या स्वातंत्र्याची जपणूक व्हावी असे वाटते. तेव्हा तो कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या घटकाकडे म्हणजे पोलिस प्रशासनाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असतो. मात्र अनेकदा पोलीस जनतेचा विश्वास संपादन करण्यास असमर्थ ठरतो आणि त्याचे पर्यवसान शेवटी संबंधात बाधा येते.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला सिंघम पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांनी मात्र त्यांच्या कार्यकाळात शिरपुरच्या जनतेची मने जिंकून त्यांचा कार्याचा ठसा त्यांनी उमटविला .त्यांनी आपल्या कार्यकतृत्वाने शिरपूर शहर आणी परीसरात चांगलच नावलौकिक मिळवला आले.शिरपूर वासीयांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली.त्यात कॅफेमध्ये धाडी टाकून तरुण -तरुणींना योग्य मार्ग दाखवणे, रोड-रोमियोंचा बंदोबस्त गरीब व अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करणे प्रेम, आपुलकी, विनम्रता,या त्रयींची जोड  देत आपल्या कार्यात नाविन्यता निर्माण केली व शत्यांनी केलेल्या सर्व  समाज हिताच्या कामामुळे त्यांची वेगळी ओळख शिरपूर तालुक्यात झाली होती. आपण एका लोकशाही राष्ट्रात राहतो जिथे जनता ही केंद्रस्थानी असून तिच्यासाठी पोलीस प्रशासन हे जनतेसाठी असते हे जनतेच्या मनात रुजवण्यात त्यांना यश आले आहे.

अश्यातच त्यांची धुळे तालुका येथे बदली झाल्याने शिरपूर येथील जनतेला त्यांची उणीव निश्चितच भासणार आहे. महिला सिंघम पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांना अंतकरनाणे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध