Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जुलै, २०२४

धुळे जिल्ह्यात निम कोटेड युरियाच्या बफर स्टॉकचा गोलमाल चौकशीची मागणी...



शासनाने पावसाळ्यात शेतकऱ्यांना युरियाची टंचाई भासू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात निम कोटेड युरियाचा व डीएपी आदी खतांचा बफर स्टॉक जिल्ह्यात ठिकठिकाणी केला होता.यासाठी MIDC ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सदर बफर स्टॉक खताचे वाटप शेतकऱ्यांची गरज व मागणी बघून करण्यात येणार होते.या बाबत स्टॉक चे वाटप नुकतेच करण्यात येत आहे.सदर बफर खताचे वाहतूक ट्रान्सपोर्टर मार्फत करण्यात येणार होते.त्यासाठी शासनाने जळगाव येथील ट्रान्सपोर्टरची नियुक्ती केली होती.सदर ट्रान्सपोर्टरने बफर खताचा स्टॉक किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे होते.

परंतु सदर बफर स्टॉकचे खताचे वाटप सुरू होऊनी आजपर्यंत कोणाला पोहोच खत ट्रान्सपोर्टरने दिलेले नाही.किरकोळ विक्रेत्यांनी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केल्या नंतरही तेही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी बघता किरकोळ विक्रेते मिळेल त्या वाहनाने खत स्वखर्चाने घेऊन जात आहेत.तसेच ज्या दुकानदाराकडे सदर खतांचा स्टॉक केला होता.त्यापैकी काही दुकानदारांनी सदर नीम युरिया खत काळा बाजारात विकून टाकले असल्याची चर्चा आहे.

तसेच काही विक्रेत्यांनी स्टॉक व्यतिरिक्त दुसऱ्याच कंपनीचा निम कोटेड युरिया दिला असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात बफर स्टॉक च्या नीम कोटेड युरियाचा काळाबाजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.कृषी विभागाने संबंधित बफर स्टॉक केलेले विक्रेते यांची चौकशी करून पडताळणी करावी. तसेच संबंधित ट्रान्सपोर्टवर देखील कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

तरुणगर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे 


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध