Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३१ जुलै, २०२४

अमळनेर नगरीत तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारा कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा संपन्न.

 


अमळनेर i उपसंपादकशामकांत पाटील    

 

अमळनेर म्हणजे संत नगरी संत सखाराम महाराज यांच्या पावनस्पर्शाने पुनीत असणारी आणि अवघ्या महाराष्ट्राची आई साने गुरुजी यांच्या कार्याने प्रफुल्लित असणारी माती.  प्रताप शेठजीहस्सीमजी प्रेमचंद (विप्रोचे अध्यक्ष ) यांचे दातृत्व आणि असंख्य मातृभूमी प्रेमी लोकांचे कर्तृत्व यामुळे अमळनेर नेहमीच खानदेशची सांस्कृतिक राजधानी बनून राहिलेली  आहे.याच मातीत एक सुंदर मनोभावी असा सोहळा रविवारी संपन्न झाला.

 


अमळनेर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचा हा सोहळा होता. महाराष्ट्राचे जलपुरुष तरुणाईचे प्रेरणास्थान  माजी आय आर एस अधिकारी डॉ. उज्वल कुमार चव्हाण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. यासोबतच सारथी संस्थेचे उपव्यवस्थापक अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार साहेब,डीवायएसपी नंदवाडकर साहेब,डॉ. शरद बाविस्कर हे देखील प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष दिगंबरजी महाले यांचा व नोबेल फाउंडेशनचे  अध्यक्ष जयदीप पाटील जळगाव यांचा अमळनेर करांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

 


याप्रसंगी यूपीएससी,एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधून यशवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे आपल्या पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना किडनी दान करणाऱ्या आधुनिक सावित्रीताई श्रीमती नूतन पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. हा सोहळा अत्यंत भावस्पर्शी आणि तितकाच प्रेरणादायी असा होता.

 


अमळनेरच्या मातीत रत्न जन्माला येतात या रत्नांपैकी एक म्हणजे पातोंडा येथील कपिल पवार साहेब. आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजाप्रती बांधिलकी असणारा एक आदर्श तरुण अधिकारी पण अधिकारी पणाचा कोणताही हावभाव आजपर्यंत कुणीही पाहिलेला नसलेले एक विनयशील ,शांत ,संयमी व्यक्तिमहत्व . संदीपकुमार साळुंखे यांनी मारवड विकास मंचची सुरुवात करून अमळनेर परिसरात समाजसेवेचा विसर्ग सुरू केला. आज विविध गावांमध्ये विकास मंच सुरू आहेत ते फक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शना मुळेच . अशा विविध विकास मंच आणि खानदेशातील प्रशासकीय अधिकारी तरुणांचे उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ यासह साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच, साने गुरुजी पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र , शिवशाही फाउंडेशन,स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल,प्रतापियन्स प्रबोधिनी, प्रताप महाविद्यालय प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ,बन्सीलाल पॅलेस या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.

 


सामाजिक संस्था एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी असे पाऊल टाकतात हेच आजच्या युगात आदर्श उदाहरण आहे. डॉ. उज्जलकुमार चव्हाण सर  यांनी अध्यक्षीय भाषणात प्रत्येक गांव व शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र उभी राहिली पाहिजेत. तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी होणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मागे राहिलेल्या भावंडांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आपण अधिकारी झालो तरी गावच्या लोकांना आपण आपल्यातीलच एक आहोत असे वाटण्यासाठी विनयशील राहणे गरजेचे आहे. सर्वात मोठी संपत्ती ही माणसे जोडणे हीच असून ती जपली पाहिजे  . जयदीप पाटी यांनी देशाला दहशतवादा पेक्षा मोठा धोखा मोबाईल पासून आहे. मोबाईलचा अतिरिक्त वापर हा समाजासाठी घातक असून, त्यामुळे घरातील जेष्ठ व लहान यांच्यातील संवाद कमी झाला आहे .त्यामुळे  देशाच्या संस्कृतीवर विपरीत परिणाम झाला  असून वृद्ध आश्रमात वेटिंग लिस्ट वाढली  आहे. यात देखील सुशिक्षित व संपन्न लोकांच्या आईवडिलांची मोठी संख्या आहे. ग्रामीण भागातील मजुरी करणाऱ्यांचे आई वडील सुखा-समाधाने खेड्यात आयुष्य घालवीत आहेत. समाज आर्थिक व सुशिक्षित झाला म्हणजे तो सुधारता असे होत नाही. त्यासाठी सुसंकृत होणे गरजेचे आहे त्यांनी परखड शब्दात आपले मत मांडत आई-वडिलांचा सांभाळ करा ,असे मार्मिक शब्दात यशाच्या  धुंदीत भरकटनाऱ्या तरुणांना समजवून सांगितले .

 


अनिल पवार यांनी सारथी संस्थेमार्फत गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली . दिगंबर महाले सर यांनी आपल्या आयुष्यात चांगले मित्र आपल्याला कसा मार्ग दाखवतात व उच्च पदापर्यंत घेवून जातात हे सांगून मित्र प्रेमाची महती सांगितली,त्याप्रसंगी ते भावूक देखील झाले. यापुढे तालुक्यातील गरीब कुटुंबातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी मंगळ ग्रह संस्थान मदत करेल असे देखील सांगितले . नंदवाळकर साहेब यांनी कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे यासाठी मार्गदर्शन  केले.कपिल पवार यानी  आपल्या मनोगतातून उपस्थित श्रोत्यांचा मनाचा ठाव घेतला मंत्रालयात आपल्या खान्देश मधील वाढणारी  अधिकारी  व कर्मचारी यांची संख्या आपल्यासाठी  आनंदाची बातमी आहे. मंत्रालयातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या माणसांची संख्या वाढल्यास आपल्या लोकांसाठी काम करण्याची संधी आपणास मिळणार आहे .

 


कार्यक्रमातून  जाणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःसोबत उत्साह,जिद्द आणि प्रेरणा घेऊन सोबत गेला. येणाऱ्या काळात उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ आणि या सर्व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खानदेशात स्पर्धा परीक्षांची क्रांती घडणार आहे यात शंका नाही.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध