अमळनेर : अमळनेर तालुक्याचा चेहरा - मोहरा बदलण्याचा ध्यास घेत अंमळनेरचा विकास २०१३ पासून पूर्ण शक्तीनिशी सेवा करीत आहेत. २०१४ मध्ये अनेकांना मोदी लाटेत पराभव दिसत असताना अमळनेर जनतेने मा.शिरीषजी चौधरी यांचा वर विश्वास दाखवून त्यांना मतदार संघात निवडून दिले व विनाधसभेवर पाठवले.
मां.शिरीषजी चौधरी हे सर्वसामान्यांची प्रश्नाची जान असणारे , युवकांचे मार्गदर्शक कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ , एक दिलदार रसिक मित्र आहेत. एक दूरदृष्टी असलेले विकासपुरुष आहेत .शिरीष दादा चौधरी हे २०१४ साली निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामसू व अभ्यासू व्यक्तिमत्वाची वेगळी छाप तालुक्यात सोडली.कार्यकर्त्यांमध्ये रमणारा, कार्यकर्त्यांसाठी उभा राहणारा, कार्यकर्त्यांना उभा करणारा नेता म्हणून त्यांची ओळख झाली.आणि कार्यकर्त्यांसोबत विश्वासाचं नातं आहे त्यांनी जपल.
२०१९ च्या थोड्याशा मतांचा पराभवानंतर देखील ते खचून न जाता अमळनेर तालुक्याचा विकासासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटत राहिलेत. कोरोना काळात देखील सर्वांच्या सेवेत ते कायम राहिलेत .स्वतः एक उत्तम व्यावसायिक असताना देखील आपण तिकडे लक्ष न देता कुटुंबाला वेळ न देता, कायम तालुक्यात कोणाचे सुख असो दुःख असो कायम रात्र पहाट न बघता हजेरी लावली ,नंदुरबार तर अमळनेर शहराचे अंतर १०० किमी असून रोजचे स्वतःच्या स्वह खर्चाने डिझेल टाकून आर्थिक आणि शारीरिक दोघे विचार न करता ते कायम ऊत्साहाने जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात.
दादा कार्यकर्त्यांसोबतच आपल्याला मोलाचे कौटुंबिक राजकीय सहकार्य मिळते ते प्रा.डॉ.रवींद्र बापूसाहेब यांचा सोबतिने व्यवसाय, राजकारण व कुटुंब यांची उत्तम सांगड घालून यश मिळवणार आपल कुटुंब आहे. तालुक्यातील अनेक विकास काम अमळनेर जनतेच्या मनात आहेत आणि आपला असलेला दिलखुलास स्वभाव सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणे , सर्वांन सोबत कायम सुख दुःखात ऊभे राहणे हे आपले प्रेम अमळनेर जनतेच्या मनात कायम घर करते.
मागील काळात तालुक्यात मा.शरद पवार साहेबांचा नावाने मिळवलेली सहानुभूती आणि आज त्याच पवार साहेबांसोबत अनेक लोक नाहीत.हे तालुक्यातील अनेक मतदारांना आणि जेष्ठ मंडळीना पटलेले नाही.म्हणून आता शिरीषजी दादा चौधरी हे कायम अमळनेर तालुक्याचे विकासपुत्र आहेत . जनता देखील आपल्या सोबत आहे. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत समजून येईलच.
एक सामान्य कार्यकर्ता संदीप पाटील - मूडी करणखेडा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा