Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल...



अमळनेर प्रतिनीधी मोराणे(ता.धुळे ) येथील अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात आदिवासी पारधी समाजातील युवक रोहित कैलास साळूंकेने CISF मध्ये अथक परिश्रम घेत यशाला गवसणी घातली. एका हातमजूरी  करणाऱ्या आई बापाच्या मुलाचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.
             
मोराणे खेडेगावातील घरची अत्यंत बेताची परिस्थिती असताना अतिशय खडतर परिश्रम घेवून रोहित ने यश मिळवले. रोहितचे आई वडिलांनी  हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. 2 मुले, बायको असे ४ जणांचे कुटुंब असताना व हलाखीची परिस्थिती असतानाही रोहितच्या आई वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले.

आदिवासी हॉस्टेल मधुन रोहितने शिक्षण व अभ्यासात सातत्य ठेवले. स्पर्धा परीक्षा देणे सुरू ठेवले. सुरवातीला अपयश येऊनही त्याने  न डगमगता स्वत:च्या हिमतीवर चिकाटी धरून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत यश संपादन केले.

परिस्थिती नाजूक आहे व पुरेसा पैसा नाही त्यामुळे अभ्यासाठी स्पर्धा परिक्षासाठी क्लासेस लावता आले नाही व चार ते पाच वेळेस परिक्षेत अपयश आले.यावेळी यश मिळवायचेच असा पक्का निर्धार त्यांने केला होता.आपण कुठे कमी पडतोय याचे स्वतः आत्मपरीक्षण करून त्याने तयारी केली. या यशाबद्दल समाज बांधव व मित्र मंडळी यांनी डि जे लावून मोराणे गावात मिरवणूक काढली आणि याप्रसंगी त्याचा सत्कार देखिल केला.

आईचे स्वप्न होते कि माझा मुलगा खुप हुशार आहे. मी कष्ट करीन पण माझ्या मुलांना शिकविन अशी जिद्द होती. आईचे स्वप्न आज रोहितने पुर्ण केले जेव्हा रोहितची CISF मध्ये निवड झाली तेव्हा रोहितच्या आईच्या डोळ्यातुन आनंदाचे अश्रू अनावरण झाले.रोहितचे आईचे नाव अनिताबाई साळूंके आणि वडिलाचे कैलास साळूंके असे आहे. आता रोहितचे स्वप्न आहे कि नोकरीतून जो पैसा येईल तो आता माझ्या लहान भावाच्या शिक्षणात लाविन आणि भावालाई नोकरीला लावेल असे स्वप्न रोहितचे आहे.
रोहित हा पत्रकार गणेश चव्हाण यांचा मामेभाऊ आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध